Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
नागपूरमध्ये स्कूल बसची सायकलस्वाराला धडक; चाकाखाली आल्यामुळे वृद्धाचा मृत्यू.

नागपूरमध्ये स्कूल बसची सायकलस्वाराला धडक; चाकाखाली आल्यामुळे वृद्धाचा मृत्यू.

नागपूर : भरधाव स्कूल बसने सायकस्वार वृद्धाला उडवल्यानंतर वृद्धाचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ही घटना घडली आहे.

रत्नाकर रामचंद्र दीक्षित (वय 63) असे या व्यक्तीचे नाव आहे.

रत्नाकर दीक्षित सायकलने छोटा ताजबाग ते तुकडोजी चौक या मार्गाने बुधवारी (ता. ८) जात होते. याचदरम्यान मागून भरधाव स्कूल बस आली. या बसने त्यांच्या सायकलला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये ते सायकलवरून खाली पडले. ते गंभीर जखमी झाले होते. स्थानिकांच्या मदतीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना रत्नाकर दीक्षित यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी बस चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

The post नागपूरमध्ये स्कूल बसची सायकलस्वाराला धडक; चाकाखाली आल्यामुळे वृद्धाचा मृत्यू… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka