Dailyhunt
नांदेडमधील प्रेमप्रकरणाचा रक्तरंजित शेवट; पोलिसांच्या तपासात वेगळीच माहिती समोर.

नांदेडमधील प्रेमप्रकरणाचा रक्तरंजित शेवट; पोलिसांच्या तपासात वेगळीच माहिती समोर.

नांदेड: प्रेमसंबंधातून सक्षम ताटे या युवकाची हत्या झाल्यानंतर प्रेयसीने मृतदेहासोबत लग्न केले असून, मृत मुलाच्या आईने जातीयवादातून मुलाची हत्या झाल्याची तक्रार दिली आहे.

मृत सक्षम ताटे (वय 20) आणि मुलीचे कुटुंब अट्टल गुन्हेगार असल्याची माहिती डी वाय एसपी प्रशांत शिंदे यांनी दिली आहे.

सक्षम ताटे आणि गजानन मामीडवार हे अट्टल गुन्हेगार होते. याच कारणामुळे सक्षमला नांदेड जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले होते. नुकताच तो तुरुंगातून सुटून बाहेर आला होता. यापूर्वी अनेक गुन्हे करताना सक्षमचे मामीडवार कुटुंबाच्या घरी येणे जाणे होते. त्यावेळी सक्षम ताटे याची गजानन मामीडवार यांची मुलगी आंचल हिच्याशी ओळख झाली होती. गेल्या तीन वर्षांपासून आंचल मामीडवार हिच्यासोबत प्रेमप्रकरण सुरु होते. मात्र, स्वतः अट्टल गुन्हेगार असलेल्या मामीडवार कुटुंबाचा सक्षम या गुन्हेगाराशी आपल्या मुलीच्या प्रेमसंबंधाला विरोध होता. जातीयवादातून हा खून झाल्याचा आरोप सक्षम ताटेच्या नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणातील मृत सक्षम ताटे आणि मुलगी आंचल मामीडवार हे दोघेही बारावी पास आहेत.

आंचल मामीडवार हिचे वडील गजानन मामीडवार आणि भाऊ हिमेश मामीडवार व साहिल मामीडवार यांनी सक्षम ताटे याची डोक्यात फरशी व दगड घालून हत्या केली. या घटनेनंतर आंचल मामीडवार हिने केलेली कृती राज्यभरात चर्चेचा विषय ठरत आहे. आंचल मामीडवार हिने सक्षमचा मृतदेह घरी आणल्यानंतर त्याच्यासोबत लग्नाचे काही विधी पार पडले. या दोघांच्याही अंगाला हळद लावण्यात आली. त्यानंतर आंचलने सक्षमच्या नावाने कपाळावर कुंकू लावले होते. त्याचे व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

सक्षम जिवंत नसला तरी मी त्याच्या मृतदेहासोबत लग्न करुन मी कायम तिकडे त्याच्या कुटुंबासोबत राहणार असल्याचे तिने सांगितले. सक्षम कायम माझ्या मनात असेल. तो जिवंत नसला तरी आमचं प्रेम जिवंत आहे, असेही आंचलने म्हटले आहे. आमचं प्रेम होतं. पण माझ्या पप्पांना आम्हा दोघांची जात वेगळी असल्यामुळे ते मंजूर नव्हते. ते म्हणायचे, दुसरं कोणाशीही बोल मी लग्न लावून देतो. सक्षम बौद्ध होता, आम्ही पद्मशाली समाजाचे आहोत. जात वेगळी असल्यामुळेच माझ्या घरच्यांनी सक्षमला संपवले. आमच्या प्रेमसंबंधामुळेच त्याला मारण्यात आले. आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, असे आंचल मामीडवार हिने म्हटले आहे.

प्रेम! प्रियकराच्या मृतदेहासोबत केलं लग्न; आयुष्यभर तुझीच राहिल…

नांदेड! युवकाची प्रेम प्रकरणातून मुलीच्या बापानं अन् भावानं केली हत्या…

एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या करणारा आरोपी 10 महिन्यानंतर टॅटूमुळे गजाआड…

प्रेमात वेडा! बार्शीत नर्तिकेच्या घरासमोर माजी उपसरपंचाने केली आत्महत्या; कारण…

पुणे! IT इंजिनिअरची सातव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या; प्रेमप्रकरण की तणाव…

Loading…

The post नांदेडमधील प्रेमप्रकरणाचा रक्तरंजित शेवट; पोलिसांच्या तपासात वेगळीच माहिती समोर… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka