पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगर भागात काही दिवसांपूर्वी पोर्शे कारच्या अपघाताने पुणे हादरले होते. पिंपरीमध्येही तशाच प्रकारची घटना घडली. पण, दैव बलवत्तर म्हणून अपघातातील युवतीचा जीव वाचला आहे.

पिंपरीत एका भरधाव वेगाने आलेल्या कारने एका मुलीला उडवले होते. या अपघातात जखमी आकांक्षा परदेशी या युवतीला केवळ मुका मार लागल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. नशिब बलवत्तर असल्यामुळेच तिचा जीव वाचल्याची प्रतिक्रिया नेटिझन्स व्यक्त करत आहेत. व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, पिंपरीत एका भरधाव कारने रस्त्याच्या बाजूने निघालेल्या युवतीला उडवले. कारचा वेग इतका होती की धडकेने ती बरेच फूट लांब फेकली गेली. त्यानंतर कार थेट एका दुकानात घुसली. हिंजवडी पोलिसांच्या हद्दीतील भुजबळ चौकात हा अपघात झाला होता.
वेगात असलेल्या कारच्या धडकेत युवती वरती उडाली आणि बाजूला पडली, त्यामध्ये केवळ तिला मुका मार लागल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे युवती आणि तिच्या कुटुंबियांनी चालकाविरोधात कोणतीही तक्रार दिली नाही, असे हिंजवडी पोलिसांनी सांगितले.
The post नशिब बलवत्तर! पिंपरी-चिंचवडमध्ये अपघाताचा धक्कादायक Video समोर… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

