Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
नाशिक हादरलं! विवाहितेनं दोन लहान चिमुरड्यांसह संपवलं जीवन.

नाशिक हादरलं! विवाहितेनं दोन लहान चिमुरड्यांसह संपवलं जीवन.

नाशिक : एका विवाहित महिलेने आपल्या दोन लहान मुलांसह शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सौंदाणे (मालेगाव) गावात घडली आहे. सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

हर्षाली राहुल अहिरे (वय 28), संकेत अहिरे (वय 5) व आरोही अहिरे (वय 7) अशी मृतांची नावे आहेत. सासरच्या छळाला कंटाळूनच हर्षाली राहुल अहिरे यांनी आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी पतीसह, सासू, सासरा, नणंद या चौघांविरोधात मालेगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मृत विवाहितेचा पती, सासरा पोलिसांच्या ताब्यात आहे. पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

The post नाशिक हादरलं! विवाहितेनं दोन लहान चिमुरड्यांसह संपवलं जीवन… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka