Dailyhunt
नाशिक जिल्हा रुग्णालयातून पाच दिवसांचे बाळ महिलेने पळवले.

नाशिक जिल्हा रुग्णालयातून पाच दिवसांचे बाळ महिलेने पळवले.

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयातून पाच दिवसांच्या बाळाची एका महिलेने चोरी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून बाळाचा शोध सुरू केला आहे.

आरोपी महिला ही बाळाला घेऊन जाताना सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे.

सुमन अब्दुल खान या मूळच्या मध्यप्रदेशच्या असून सटाणा तालुक्यात राहतात. नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात 29 डिसेंबर रोजी त्यांची प्रसूती झाली. त्यानंतर बाळ आणि आई दोघांना वेगवेगळ्या वार्डमध्ये शिफ्ट करण्यात आले होते. बाळाला आणि महिलेला शनिवारी डिस्चार्ज देण्यात आला. पण बाळाला मात्र दुसऱ्याच महिलेने चोरून नेल्याची घटना घडली. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. बाळ चोरी झाल्यामुळे बाळाच्या आईने मात्र रुग्णालयातच टाहो फोडला.

दरम्यान, रुग्णालयात असताना पाच दिवसात एका अनोळखी महिलेने खान कुटुंबीयांशी ओळख वाढवली. डिस्चार्ज देताना ती महिला वार्डमध्ये आली आणि खाली गाडी पर्यंत बाळाला घेऊन जाते असे सांगत तिने बाळाला घेतले. नंतर बाळाला घेऊन तिने रुग्णालयातून थेट पळ काढला. आरोपी महिला ही बाळाला घेऊन जाताना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस महिलेचा शोध घेत आहेत.

लहान मुलांच्या चोरीचे रॅकेट उद्ध्वस्त; आठ नवजात बाळांची सुटका…

हृदयद्रावक घटनेने पुणे हादरले! नवजात बालकाच्या तोंडावर चक्क प्लास्टिकची पिशवी बांधली अन्…

निर्दयी! पुणे शहरात कचऱ्यात आढळले नवजात अर्भक…

बारामती हादरली! स्वच्छतागृहात आढळलं स्त्री जातीचं मृत अर्भक…

सार्वजनिक शौचालयातील कचऱ्यात आढळले अर्भक…

The post नाशिक जिल्हा रुग्णालयातून पाच दिवसांचे बाळ महिलेने पळवले… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka