Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
नाशिक! महिलेकडून १४ मुलं-मुलींना जन्म अन् पैशांसाठी पोटच्या मुलाला.

नाशिक! महिलेकडून १४ मुलं-मुलींना जन्म अन् पैशांसाठी पोटच्या मुलाला.

नाशिक: त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाके देवगाव येथील बरड्याची वाडी वावीहर्ष पाड्यावर राहणाऱ्या महिलेने (वय ४५) तब्बल 14 मुलं मुलींना जन्म दिला आहे. या महिलेने मुलांचे संगोपन होत नाही आर्थिक अडचण आणि मुलांना आजारपणात योग्य उपचार मिळत नसल्यामुळे 14 मुला मुलींपैकी सहा मुलं आणि मुली विकल्याचा संशय स्थानिक सामाजिक कार्यकर्त्याने उपस्थित केला आहे.

या घटनेने एकाच खळबळ उडाली आहे.

बच्चुबाई हंडोगे महिलेला तब्बल 14 मुलं आणि मुली झाल्या. यापैकी सहा हून जास्त मुला मुलींची पैशासाठी विक्री झाल्याचा संशय स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आला. 10 ऑक्टोंबर 2025 रोजी या महिलेला एक पुरुष लिंगाचे अपत्य झाले आणि या अपत्याचा वजन कमी असल्याने आरोग्य विभागाकडून या नवजात बाळाचे आरोग्याची तपासणी आशा कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून त्या महिलेच्या घरी सुरू होती. मात्र या महिलेला मुलाचे संगोपन होत नसल्याने ते मूल तिने विकल्याची माहिती अशा सेविकेसह स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांना मिळाली. ज्यावेळी या मुलाची आरोग्य तपासणी करण्यासाठी स्थानिक अशा सेविका नेहमीप्रमाणे गेली त्यावेळी तिला या महिलेने तिचे नवजात बाळ विकल्याचा संशय आला आणि या आधीचे देखील दोन ते तीन लहान मुलं आणि मुली विकल्याची माहिती मिळाली.

अशा सेविकेने नेहमीच्या तपासणी दरम्यान या या बाळाच्या घरी जाऊन आरोग्य तपासणी करण्यासाठी बाळ कुठे असे विचारलं तेव्हा ते बाळ देऊन टाकलं असे उत्तर या अशा सेविकेला बाळाच्या आईकडून मिळाले. या आधी देखील दोन ते तीन वेळा अशाच घटना घडल्याने अंगणवाडीच्या अशा सेविकेचा लहान बाळ विकून टाकल्याचा संशय वाढला आणि तात्काळ वरिष्ठांना आशा वर्करने घडलेला प्रकार सांगितला. या प्रकरणात डॉक्टरांकडून देखील घटनेची माहिती मिळताच प्रकरणाची सखोल चौकशी सुरू करण्यात आली.

दरम्यान, कोणतीही मदत या महिलेला मिळाली नाही आणि आर्थिक अडचणीमुळे बाळाचे संगोपन न झाल्याने जन्म दात्या आईनेच बाळ विकल्याचा संशय व्यक्त करत आरोग्य विभागाच्या अकार्यक्षम कृतीने जन्मदात्या आईवर नवजात बाळाला विकल्याची वेळ आली असा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आला आहे. मात्र पैशासाठी नाही तर हालकीचे जीवन जगत असताना बाळाचे आजारपण आणि त्याला दूध मिळत नसल्याने हे बाळ आम्ही नातेवाईकांना दत्तक म्हणून दिले या आधी देखील आमच्या नातेवाईकांमध्ये बाळ सांभाळण्यासाठी दिल्याचा खुलासा बच्चुबाई हंडोगे आणि विष्णू हंडोगे या दांपत्याने केला आहे.

या प्रकरणात जिल्हा प्रशासनाकडून समिती देखील गठीत करण्यात आली असून या समितीच्या माध्यमातून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देखील जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. घोटी पोलिसांकडून तात्काळ या मुलांचा शोध घेण्यासाठी तीन पथके शहापूर, ठाणे आणि इतर भागात रवाना करण्यात आली आहेत.

कुख्यात गुंड भूषण लोंढे 34 फुटांवरून उडी मारूनही अडकला नाशिक पोलिसांच्या जाळ्यात…

नाशिक! एकाच कुटुंबातील 4 जणांचे मृतदेह सापडले; मृतांमध्ये दोन चिमुकले…

नाशिक! करोनात पतीचं निधन अन् महिलेचा अपघाती मृत्यू; 5 लेकरं…

नाशिक! भोंदूबाबाची महिलेली धमकी; माझ्यासोबत शरीरसंबंध ठेव नाहीतर…

नाशिक! गर्लफ्रेंडमुळे तीन वर्ष जगायला मिळाली; लव्ह यू अन् गूड बाय…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka