Dailyhunt
नाशिक पोलिसांनी कोट्यावधींचा मुद्देमाल तक्रारदारांना केला परत.

नाशिक पोलिसांनी कोट्यावधींचा मुद्देमाल तक्रारदारांना केला परत.

नाशिक : नाशिक पोलिसांनी वेगवेगळ्या कारवायांमध्ये जप्त केलेला एक कोटी रुपयांचा मुद्देमाल ७५ तक्रारदारांना परत केला आहे. चोरीस गेलेला मुद्देमाल परत मिळाल्याने तक्रारदारांनी पोलिसांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

नाशिकरोड पोलिस ठाण्यात बुधवारी मुद्देमाल प्रदान करण्याचा कार्यक्रम पार पडला.

पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक!

पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त मोनिका राऊत, सहायक आयुक्त शेखर देशमुख, डॉ. सचिन बारी, परिमंडळ दोन अंतर्गत येणाऱ्या पोलिस ठाण्यांचे वरिष्ठ निरीक्षक यावेळी उपस्थित होते. यावेळी संदीप कर्णिक यांनी मनोगत व्यक्त केले. चोरीस गेलेला मुद्देमाल परत मिळेल की नाही, ही तक्रारदारांना शंका असते. परंतु, नाशिक पोलिस दलातील अधिकारी, कर्मचारी यांनी अनेक गुन्ह्यातील मुद्देमाल चोरट्यासह ताब्यात घेऊन पुन्हा तक्रारदारांना दिला आहे. त्यामुळे तक्रारदारांना होणारे समाधान आणि आशीर्वाद आपल्याला पिढ्यानपिढ्या कामास येईल, असा विश्वास संदीप कर्णिक यांनी व्यक्त केला.

परिमंडळ दोनमधील सहा पोलिस ठाण्यातील ७५ तक्रारदारांना एक कोटीचा मुद्देमाल परत करण्यात आला. यामध्ये सातपूर पोलिस ठाण्यातील सहा लाख ३८ हजार २०९, इंदिरा नगरातील १४ लाख ३७ हजार २१४, अंबडमधील १० लाख ८७ हजार ८८०, उपनगर कडील २९ लाख २२ हजार ७५८, देवळालीतील सहा लाख ५२ हजार ५४० रुपयांचा मुद्देमाल परत करण्यात आला. यावेळी बीट मार्शल कर्मचाऱ्यांना पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते हेल्मेट वाटप करण्यात आले.

संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!

नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांचा दुचाकीस्वारांना दणका…

नाशिकचे पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांच्या संकल्पनेमधून नागरीकांशी सुसंवाद!

नाशिकचे पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली कोम्बिंग ऑपरेशन…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

The post नाशिक पोलिसांनी कोट्यावधींचा मुद्देमाल तक्रारदारांना केला परत… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka