Dailyhunt
नाशिक! सावत्र आईने अल्पवयीन मुलासोबत ओलांडल्या मर्यादा.

नाशिक! सावत्र आईने अल्पवयीन मुलासोबत ओलांडल्या मर्यादा.

नाशिक : नाशिक शहरातील उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत आई अन् मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका महिलेने आपल्या सावत्र मुलासोबत नको ते कृत्य केले आहे. पोलिसांनी पोक्सो कायद्याअंतर्गत सावत्र आईवर गुन्हा दाखल केला आहे.

नाशिक शहरातील गायकवाड मळा परिसरात ही घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलाच्या सख्ख्या आईने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, तिचा १३ वर्षीय मुलगा आणि ८ वर्षीय मुलगी पतीकडे राहतात. पतीसोबत राहणाऱ्या या सावत्र आईकडून मुलांना वेळोवेळी मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जात होता. मुलांना जेवण न देणे, उन्हात उभे करणे असे अमानुष प्रकार ती करत होती. या त्रासासोबतच, सावत्र आईने मोठ्या मुलासोबत अश्लील बोलणे, नकळतपणे त्याचे व्हीडिओ काढणे आणि घरात एकटा असताना त्याच्यासोबत अश्लील कृत्य केल्याचा धक्कादायक आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकारामुळे मुलगा अतिशय घाबरला होता. त्याने घडलेला प्रकार आपल्या आईला सांगितला.

मुलाचे म्हणणे ऐकून आईने तातडीने चाइल्ड हेल्पलाइनवर संपर्क साधला आणि ऑनलाईन तक्रार दाखल केली. या तक्रारीची गंभीर दखल घेत उपनगर पोलिसांनी तातडीने संशयित महिलेच्या (वय ३४) विरोधात ‘POCSO’ कायद्याच्या कलमांनुसार गुन्हा दाखल केला. या गंभीर गुन्ह्याचा तपास पोलिस करत आहेत. आई-वडील विभक्त झाल्यानंतर मुलांचे संगोपन करणाऱ्या सावत्र आईकडूनच असा प्रकार घडल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

नाशिक! देवदर्शनासाठी जाणाऱ्या व्यक्तीवर पहाटेच्या सुमारास हत्या…

नाशिक! गर्लफ्रेंडमुळे तीन वर्ष जगायला मिळाली; लव्ह यू अन् गूड बाय…

नाशिक! माझ्या हॉटेलमध्ये कॉलगर्ल्स पुरवल्या जातात, आता तुम्ही तेच काम करा…

नाशिक! नवविवाहित पत्नीच्या प्रियकराकडून नवऱ्याचे अपहरण करण्याचा थरारक प्रयत्न…

नाशिक! प्रेमीयुगुलाने हातात हात घेऊन मारली रेल्वेसमोर उडी…

The post नाशिक! सावत्र आईने अल्पवयीन मुलासोबत ओलांडल्या मर्यादा… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka