नाशिकः पुणे येथील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण ताजे असतानाच नाशिकमधील उच्चभ्रू वस्ती असलेल्या गंगापूर येथे विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भक्ती अपूर्व गुजराथी असे आत्महत्या करणाऱ्या विवाहित महिलेचे नाव आहे.
याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात सासरच्या लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भक्ती अपूर्व गुजराथी यांची सासू, सासरे, पती, नणंद ही सासरची मंडळी तिला त्रास देत होती, असा आरोप तिच्या आत्महत्येनंतर नातेवाईकांनी केला आहे. गंगापूर रोड परिसरातील अथर्व योगेश गुजराथी (वय 40) याची पत्नी भक्ती अथर्व गुजराथी (वय 37) यांनी घरातील जाचाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. भक्ती अथर्व गुजराती यांचे वडील दिलीप प्रभाकर माडीवाले हे व्यवसायने सराफी आहेत. आपल्या मुलीने आत्महत्या केली असे कळताच त्यांनी नाशिक येथे येऊन तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार गंगापूर पोलिस स्टेशन येथे दाखल केली आहे. मृत भक्ती अथर्व गुजराती यांना 5 वर्षाचा मुलगा असून भक्ती गुजराती यांच्या माहेरच्या कुटुंबीयांनी भक्तीचा फरार पती अथर्व गुजराथी याला तत्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.
अंत्यसंस्कारावेळी संतप्त नातेवाईक व येवलेकर नागरिकांनी निषेध व्यक्त करणारे तसेच भक्तीला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांना त्वरित अटक झालीच पाहिजे, दोषींवर कारवाई झालीच पाहिजे, अटक करा, अटक करा, दोषींना अटक करा, दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, आमच्या मुलीला न्याय मिळालाच पाहिजे, अशा आशयाचे फलक अंत्ययात्रेत झळकवत न्यायासाठी टाहो फोडला.
महाराष्ट्र हादरला! विवाहित महिलेने सासरच्या त्रासाला कंटाळून संपवलं जीवन…
पुणे शहरात आणखी एका विवाहितेचा हुंड्यासाठी छळ; संपवलं जीवन…
निलेश चव्हाण याचे कारनामे उघड; फॅन, एसीमध्ये spy कॅमेरा अन् आक्षेपार्ह्य व्हिडिओ…
राजेंद्र हगवणे अटकेपूर्वी कुठे-कुठे फिरला; धक्कादायक माहिती समोर…
राजेंद्र हगवणे याला पहाटे अटक; हॉटेलमध्ये मारत होता तांबडा-पांढरा रस्स्यावर ताव…
वैष्णवीचं 9 महिन्याचं बाळ मिळालं; नातवाला जवळ घेताच आजोबांच्या डोळ्यात आलं पाणी…
The post नाशिकच्या उच्चभ्रू वस्तीमधील विवाहित महिलेची आत्महत्या… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

