नाशिक : नाशिक शहरात मद्यधुंद कार चालकाने एका महिलेच्या कारला धडक दिली. अपघातानंतर आपली बहिण पोलिस दलात असल्याचे सांगत मद्यधुंद युवकाने महिलेच्या मदतीसाठी धावलेल्या नागरिकांना दमदाटी केली.
अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत पाथर्डी फाटा परिसरात युवकाच्या कारने महिलेच्या कारला धडक दिली. अपघात समोरासमोर झाल्याने यात महिला चालक जखमी झाली. यानंतर महिलेच्या मदतीला धावलेल्यांना युवकाने दमबाजी आहे.
बहिण पोलिस दलात असल्याचे सांगत युवकाने नागरिकांना दमबाजी केली आहे. संशयित युवक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. युवकाच्या दमबाजीचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. अंबड पोलिसांकडून घटनेचा पुढील तपास सुरु आहे.
The post नाशिकमधील युवकाच्या दमबाजीचा व्हिडिओ व्हायरल… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

