नाशिकः नाशिक जिल्ह्यातील गुजरात महामार्गावरील सापुतारा घाटात आज (रविवार) पहाटे 5.30 वाजण्याच्या सुमारास खासगी बसला अपघात झाला. बस अपघातात सात ठार तर १५ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नाशिकहून देवदर्शन केल्यानंतर गुजरातकडे देवदर्शन करण्यासाठी प्रवासी जात असताना हा अपघात झाल्याची माहिती पुढे आली आहे. या खासगी बसमधील सर्व प्रवासी हे मध्य प्रदेशमधील असल्याची माहिती आहे. सापुतारा घाटात 200 फूट खोल दरीत बस कोसळली. हा अपघात इतका भीषण होता की बसचे दोन तुकडे झाले. बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
दरम्यान, अपघातस्थळी आता मदत आणि बचाव कार्य सुरु आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
The post नाशिकमध्ये बस दरीत कोसळली, 7 जण ठार, 15 गंभीर जखमी… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

