नाशिक : नाशिकमध्ये माजी नगरसेविका जयश्री खर्जुल यांचे पती नितीन खर्जुल व त्यांचे बंधू किरण खर्जुल आणि दीपक खर्जुल यांच्यावर अल्पवयीन मुलांच्या टोळक्याने धारदार शस्त्रांनी हल्ला केला आहे.
अल्पवयीन मुलांचे एक टोळकं रस्त्यात वाढदिवस साजरा करत असताना दहशत माजवत होते. या टोळक्यावर कारवाई करण्यासाठी स्थानिक नागरिकांनी नगरसेवक म्हणून खर्जुल यांच्याकडे तक्रार केली होती. या टोळक्याला समज देण्यासाठी गेलेल्या खर्जुल कुटुंबियांवरच या टोळक्याने हल्ला केला.
या घटनेत खर्जुल कुटुंबातील तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी नाशिकच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हल्ल्याच्या घटनेनंतर नाशिक रोड परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
The post नाशिकमध्ये माजी नगरसेविकेच्या पतीसह दोघांवर जीवघेणा हल्ला… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

