Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
नाशिकमध्ये मोकळ्या जागेत मृतदेह आढळून आल्याने उडाली खळबळ.

नाशिकमध्ये मोकळ्या जागेत मृतदेह आढळून आल्याने उडाली खळबळ.

नाशिक : नाशिकरोड परिसरातील नवले चाळ येथे मोकळ्या जागेत युवकाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मृत युवक सिन्नर फाटा परिसरातील असल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

स्थानिक नागरिकांनी नवले चाळ भागातील मोकळ्या जागेत एक मृतदेह आढळल्याचे पोलिसांना सांगितले. स्थानिकांनी दिलेल्या या माहितीनंतर नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी हे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी केलेल्या चौकशीनंतर मिळालेला मृतदेह हा सिन्नर फाटा येथे राहणाऱ्या अजय शंकर भंडारी याचा असल्याचे समोर आले.

पोलिसांनी हा मृतदेह शवविच्छेदनासाठी नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला असून, मारेकऱ्यांचा शोध नाशिक पोलिसांकडून सुरू झाला आहे.

The post नाशिकमध्ये मोकळ्या जागेत मृतदेह आढळून आल्याने उडाली खळबळ… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka