Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
नाशिकमध्ये सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या अन्.

नाशिकमध्ये सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या अन्.

नाशिक : नाशिक शहरातील उपनगर भागात गावठी कट्टा विक्री करणाऱ्या सराईत गुंडाला अटक करण्यात युनिट क्रमांक १, गुन्हे शाखेला यश आले आहे. सराईत गुंडाकडून दोन गावठी कट्टे आणि दोन काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

सचिन ओमचंद कागडा (वय 25, रा. उपनगर मनपा हॉस्पिटल शेजारी, उपनगर, नाशिक) असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुंडाचे नाव आहे.

नाशिक शहरामध्ये सराईत गुन्हेगारांविरोधात कारवाई करण्याचे आदेश पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिले आहेत. त्यानुसार, अंमलदार प्रदीप म्हसदे, विशाल देवरे हे गस्तीवर असताना त्यांना सराईत गुन्हेगार सचिन कागडा हा उपनगर मनपा बिल्डिंगजवळ गावठी कट्टे विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून सराईतास अटक केली.


सराईत गुंडाची झडती घेतली असता त्याच्याकडून दोन गावठी कट्टे व दोन जिवंत काडतुसे असा 61 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. प्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड, सहायक निरीक्षक हेमंत तोडकर, उपनिरीक्षक रवींद्र बागुल, विशाल काठे, प्रदीप म्हसदे, प्रवीण वाघमारे, शरद सोनवणे, धनंजय शिंदे, विशाल देवरे, प्रशांत मरकड, जगेश्वर बोरसे, राम बर्डे, समाधान पवार आदींच्या पथकाने केली आहे.

The post नाशिकमध्ये सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या अन्… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka