Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
नाशिक-दिंडोरी मार्गावर भीषण अपघात, पाच जणांचा जागीच मृत्यू.

नाशिक-दिंडोरी मार्गावर भीषण अपघात, पाच जणांचा जागीच मृत्यू.

नाशिक : नाशिकच्या दिंडोरी-म्हसरुळ रस्त्यावर बोलेरो आणि दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघात इतका भीषण होता की दुचाकीवर असणारे रस्त्याच्या बाजूला उडून पडले होते.

अपघातानंतर रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती.

नाशिकच्या दिंडोरी म्हसरूळ महामार्गावर आज (शुक्रवार) दुपारी दुचाकी आणि बोलेरो गाडीचा भीषण अपघात झाला. आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पुढे जानोरी फाट्यावर इंडियन ऑइल पेट्रोल पंपाजवळ दुचाकी आणि पिकअपची धडक झाली. या धडकेत ५ जण ठार झाले आहेत. तर काही जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. देण्यात आली आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. अपघात इतका भीषण होता की बोलेरोचा चक्काचूर झाला आहे. तर दुचाकीवर असणारे रस्त्याच्या बाजूला पडले होते. घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता. अपघातातील मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. तर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात येत आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

The post नाशिक-दिंडोरी मार्गावर भीषण अपघात, पाच जणांचा जागीच मृत्यू… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka