Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
नात्याला काळीमा! चुलतभाऊ अन् आजोबांकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार.

नात्याला काळीमा! चुलतभाऊ अन् आजोबांकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार.

बीड: एका अल्पवयीन मुलीवर तिच्या चुलत भावाने आणि सख्ख्या आजोबानेच अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी 15 वर्षीय पीडित मुलीच्या तक्रारीवरून नेकनूर पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पीडित मुलगी आपल्या कुटुंबासोबत बीड तालुक्यात राहत होती. काही महिन्यांपूर्वी ती शेळ्या चारण्यासाठी शेतात जात असताना तिच्या 18 वर्षीय चुलत भावाने तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा आरोप आहे. त्यानंतर मुलीचे आई-वडील मजुरीसाठी परराज्यात गेले असताना, घरात कोणी नसल्याची संधी साधून आरोपीने पुन्हा तिच्यावर अत्याचार केल्याचे समोर आले. पीडितेने हा प्रकार वडिलांना फोनवरून सांगितला होता. मात्र, आरोपीच्या नातेवाईकांनी समजूत काढत पोलिसांत तक्रार देऊ नये, अशी विनंती केल्याने प्रकरण काही काळ दडपून ठेवण्यात आले.

पीडितेच्या सख्ख्या आजोबानेही तिच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला घरात कोणी नसताना तिच्याशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी मुलीने प्रतिकार करत तेथून पळ काढला. मात्र, काही दिवसांनी पुन्हा धमकी देत तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकारांमुळे पीडित मुलगी गंभीर मानसिक तणावाखाली गेली होती. प्रकृती बिघडल्याने तिला उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील महिला डॉक्टरांनी विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, मुलीने आपल्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती दिली. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर तिने अखेर पोलिसांकडे धाव घेतली.

पीडितेच्या जबाबानंतर पोलिसांनी तिचा चुलत भाऊ आणि आजोबा या दोघांविरुद्ध पोक्सो कायद्यानुसार गुन्हे दाखल केले आहेत. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

पुणे शहरात अल्पवयीन मुलीवर नातेवाईकाने केला अत्याचाराचा प्रयत्न…

बीड पुन्हा हादरले! अल्पवयीन मुलीवर चुलत्याने केला अत्याचार; मुलीचा मृत्यू…

नगर हादरलं! अल्पवयीन मुलीवर पाच दिवस जंगलात लैंगिक अत्याचार…

कोल्हापूर! मुख्याध्यापकाने अल्पवयीन विद्यार्थिनीवर केला लैंगिक अत्याचार…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka