Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
नवरा शारिरीक सुख देऊ शकत नव्हता अन् दीरासोबत अनैतिक संबंध.

नवरा शारिरीक सुख देऊ शकत नव्हता अन् दीरासोबत अनैतिक संबंध.

वी दिल्ली: एका महिलेला तिच्या पतीची हत्या केल्याबद्दल पोलिसांनी तिला अटक केली आहे. पोलिसांनी पत्नीच्या फोनवरील हिस्ट्री तपासली तेव्हा 'व्यक्तीला मारण्याच्या पद्धतीचा' शोध घेण्यात आल्याचे स्पष्ट झाले.

फरजाना खान नावाच्या महिलेने चौकशीदरम्यान कबूल केले की, तिने तिचा पती मोहम्मद शाहिद उर्फ इरफान याची हत्या केली कारण ती या नात्यात खूश नव्हती

फरजाना (वय २९, रा. बरेली) हिने चौकशीवेळी पोलिसांना असेही सांगितले की, शाहीद (वय ३२) तिला शारिरीक सुख देऊ शकत नव्हता. याशिवाय, तो कर्जबाजारी होता आणि ऑनलाइन जुगार खेळायचा. तिचे त्याच्या चुलत भावासोबत प्रेमसंबंध होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय गांधी रुग्णालयातून पोलिसांना फोन आला की एका व्यक्तीला मृत अवस्थेत आणण्यात आले आहे. शाहिदचा मृतदेह घेऊन रुग्णालयात पोहोचलेल्या त्याच्या भावाने पोलिसांना सांगितले की, शाहिदने कर्जामुळे आत्महत्या केली आहे. पण त्याच्या शरीरावर तीन जखमा पाहून पोलिसांना संशय आला. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये ती हत्या असल्याचे उघड झाले. डॉक्टरांनी सांगितले की शरीरावर ज्या प्रकारच्या जखमा आहेत त्या स्व:ता केलेल्या नाहीत. पोलिसांनी या मृत व्यक्तीच्या पत्नीचा फोन तपासला. त्यावेळी पोलिसांनी तिला सांगितले की, ‘इंटरनेटवरील सर्च हिस्ट्रीमध्ये असे आढळले की ‘झोपेच्या गोळ्या (सल्फा) देऊन एखाद्याला कसे मारायचे’ शोधले गेले आहे. याशिवाय, चॅट हिस्ट्री कशी डिलीट करायची हे देखील शोधले गेलेले आहे’, जेव्हा फरजानला हे पुरावे तिच्यासमोर ठेवून चौकशी करण्यात आली तेव्हा तिने आपला गुन्हा कबूल केला.

फरजाना म्हणाली, ती या लग्नामुळे खूश नव्हती. शारीरिक सुखाचा अभाव आणि आर्थिक परिस्थिती दोन्हीमुळे ती पतीसोबत सुखी नव्हती. तिचे तिच्या पतीच्या बरेली येथे राहणाऱ्या चुलत भावासोबत प्रेमसंबंध होते.’ दरम्यान, मंगळवारी फरजानाला अटक करण्यात आली आणि पुढील तपास सुरू आहे.

दीराच्या प्रेमात वेडी झाली अन् नवऱ्याला संपवलं; चॅटींग व्हायरल…

सोलापूरमधील दीर-वहिणी प्रेमसंबंध! जळलेल्या महिलेलं गुढ उलगडलं…

वहिनीसोबत अनैतिक संबंध अन् फिर्यादीच निघाला मुख्य आरोपी…

The post नवरा शारिरीक सुख देऊ शकत नव्हता अन् दीरासोबत अनैतिक संबंध… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka