नवी दिल्ली: पाकिस्तानी दहशतवादी छावण्यांवर भारतीय हवाई हल्ल्याच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी सहभागी झाल्या होत्या. पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यानंतर लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी या चर्चेत आल्या आहेत.
सोफिया कुरेशी या गुजरातच्या रहिवासी आहेत. त्यांचा जन्म 1981 मध्ये गुजरातमधील वडोदरा येथे झाला. त्यांनी बायोकेमिस्ट्रीमध्ये पोस्ट ग्रेज्युएशन केले आहे. सोफिया यांचे आजोबा देखील भारतीय सैन्यात होते. त्यांच्या वडिलांनी काही वर्ष भारतीय सैन्यात शिक्षक म्हणून काम केले आहे. सोफिया यांचा विवाह मेकॅनाइज्ड इन्फंट्रीचे आर्मी ऑफिसर मेजर ताजुद्दीन कुरेशी यांच्याशी झाला आहे. समीर कुरेशी असे त्यांच्या मुलाचे नाव आहे.
सोफिया कुरेशी यांची 1999 मध्ये भारतीय सैन्य दलात एन्ट्री झाली. त्यांनी 1999 मध्ये त्यांनी चेन्नई येथील ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीमधून प्रशिक्षण घेतले आहे. यानंतर, सोफिया यांना सैन्यात लेफ्टनंट म्हणून कमिशन मिळाले. 2006 मध्ये, सोफिया यांनी काँगोमधील संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेत लष्करी निरीक्षक म्हणून काम केले. 2010 पासून त्या शांतता मोहिमांमध्ये सहभागी आहेत.
सोफिया कुरेशी यांना ऑफिसर कमांडिंग-इन-चीफकडून प्रशंसा पत्र देखील मिळालो आहे. उत्तर-पूर्व भारतातील पूर मदत कार्यादरम्यान त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना सिग्नल ऑफिसर इन चीफ प्रशंसा पत्र देखील देण्यात आले. त्यांना फोर्स कमांडरकडून प्रशंसापत्रही मिळाले आहे.
लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी चर्चेत यांनी एका बहुराष्ट्रीय लष्करी सरावात भारतीय संघाचे नेतृत्व केले. तेव्हा अशी कामगिरी करणाऱ्या सोफिया एकमेव महिला अधिकारी होत्या. या सरावाला 'एक्सरसाइज फोर्स 18' असे नाव देण्यात आले. त्यावेळी भारताने आयोजित केलेला हा सर्वात मोठा परदेशी लष्करी सराव होता. या सरावात सहभागी झालेल्या 18 तुकड्यांमध्ये लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी या एकमेव महिला अधिकारी होत्या. भारतीय संघात एकूण 40 सदस्य होते. त्यावेळी त्या भारतीय सैन्याच्या सिग्नल कोरमध्ये अधिकारी होत्या.
The post Operation Sindoor: कोण आहेत लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

