Dailyhunt
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात तुमचं नाव आलंय; कोट्यावधींना गंडा.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात तुमचं नाव आलंय; कोट्यावधींना गंडा.

पुणे : राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) अधिकारी बोलत असून, पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी तुमचं नाव जोडलं गेलंय' अशी भीती दाखवत भामट्याने एका 70 वर्षीय नागरिकाची तब्बल 1 कोटी 44 लाख 60 हजार रुपयांची फसवणूक केली आहे.

पुण्याच्या सायबर पोलिस ठाण्यात याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे शहरातील कोथरुड येथील महात्मा सोसायटी रस्त्यावर तक्रारदार राहात आहेत. 23 सप्टेंबर 2025 ते 08 ऑक्टोबर 2025 दरम्यान त्यांना एक अनोळखी क्रमांकावरून फोन आला. फोनवरील व्यक्तीने स्वत:ला “एनआयएचा वरिष्ठ अधिकारी” असल्याचे भासवले. त्याने सांगितले की, “तुमचं बँक खातं पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी संबंधित आर्थिक व्यवहारात वापरण्यात आलं आहे. त्यामुळे तुमच्यावर गंभीर संशय आहे. जर सहकार्य केलं नाही, तर कायदेशीर कारवाई होईल.”

“संपूर्ण तपास पूर्ण होईपर्यंत तुमच्या सर्व बँक खात्यातील रक्कम तात्पुरती 'सुरक्षित खात्यात' ट्रान्सफर करावी लागेल.” यानंतर घाबरलेल्या तक्रारदाराने वेगवेगळ्या खात्यांतून 1.44 कोटी रुपये चोरट्याने सांगितलेल्या खात्यांवर पाठवले. काही दिवस गेल्यानंतरही रक्कम परत मिळाली नाही, आणि संबंधित व्यक्तीशी संपर्कही तुटला. यानंतर तक्रारदाराने सायबर पोलिस ठाण्यात धाव घेतली.

ज्येष्ठ नागरिकाच्या तक्रारीवरून पुणे सायबर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात भारतीय दंड संहिता व माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 मधील कलम 66 (डी) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

Loading…

The post पहलगाम दहशतवादी हल्ल्यात तुमचं नाव आलंय; कोट्यावधींना गंडा… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka