Dailyhunt
पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर हल्लाप्रकरणी गुन्हा दाखल.

पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर हल्लाप्रकरणी गुन्हा दाखल.

पुणे : पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर हल्ला केल्याप्रकरणी भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यासह 43 आंदोलकांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर आता निर्भया बनो या कार्यक्रमाच्या आयोजकावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निखिल वागळे यांच्यावरही गुन्ह्याची नोंद झाली आहे. पुण्यातील राष्ट्र सेवा दलमध्ये निर्भया बनो या कार्यक्रमाच्या ठिकाणी घडलेल्या गदारोळानंतर किमान 200 ते 250 जणांवर गुन्ह्याची नोंद झाली आहे.

या प्रकरणात दोन गुन्हे दाखल झाले आहे. पहिला गुन्हा हा आंदोलनकर्ते आणि गाडी फोडणाऱ्या कार्यकर्त्यांवर दाखल करण्यात आला आहे तर दुसरा गुन्हा आयोजक, निखिल वागळे, महायुती आणि महाविकास आघाडी या सगळ्या 200 ते 250 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे शहरातील राष्ट्र सेवा दलात निर्भया बनो या कार्यक्रमस्थळाजवळ जमावबंदीचा आदेश देण्यात आला होता. या आदेशाचे उल्लंघन करुन हे सगळे कार्यकर्ते सभास्थळी जमले होते. त्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी गाडीफोड केली, शाईफेक केली यामुळे मोठ्या प्रमाणात गोंधळाचे वातावरण निर्माण केले. तर महाविकास आघाडीचे सगळे कार्यकर्ते भाजपविरोधात आंदोलन करण्यासाठी एकत्र आले होते. यावेळी दोघेही आमनेसामने आल्यामुळे मोठा गदारोळ झाला. पोलिसांच्या आदेशाचे आणि जमावबंदीचे उल्लंघन केल्याने या सगळ्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

भाजपकडून होत असलेल्या कडाडून विरोधानंतरही निखिल वागळे कार्यक्रमस्थळी पोहोचले. यावेळी निर्भय बनो कार्यक्रमाासाठी आलेल्या नागरिकांनी वागळे यांच्यावरील हल्ल्याचा निषेध केला. यामध्ये काही तरुणीसुद्धा जखमी झाल्या आहेत. भाजप कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेल्या हल्ल्यात वागळे यांच्या अंगावरही शाई फेकली. पोलिस बंदोबंदास्त प्रवास होत असतानाही गाडी चारी बाजूने अंडी फोडण्यात आली आहे. भाजपकडून विरोध केल्यानंतर महाविकास आघाडीकडून वागळे यांचा कार्यक्रम होणारच, असा पवित्रा घेतला. वीटा सुद्धा फेकून मारण्यात आला, असा आरोप महिला कार्यकर्त्यांनी केला. कपडे फाडण्याचा सुद्धा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप काही महिलांनी केला.

या सगळ्या प्रकारामुळे मोठ्या प्रमाणात गदारोळ निर्माण झाला होता. सभास्थळी वेगवेगळ्या प्रकारच्या घोषणाबाजी करण्यात येत होती. महायुती आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याने काही काळ प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता. निखिल वागळे यांनी ज्येष्ठ भाजप नेते लालकृष्ण अडवाणी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आक्षेपार्ह विधान केले होते. त्यामुळे भाजप आक्रमक झाले आणि त्यांनी निखिल वागळे यांना विरोध केल्याची माहिती पुढे आली आहे.

कमला नेहरू रुग्णालयात पत्रकाराच्या वाहनाची जाणीवपूर्वक तोडफोड…

अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार; ॲाफिसमध्ये नेमकं काय काय घडलं?

गोळीबाराच्या घटनेतील माजी नगरसेवकाचा उपचारादरम्यान मृत्यू…

पोलिस आयुक्त अमितेश कुमार ऍक्शन मोडवर; गुन्हेगारांमध्ये धडकी…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

The post पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर हल्लाप्रकरणी गुन्हा दाखल… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka