नाशिक: फेसबुकवर ओळख झालेल्या एका महिलेनं एका कृषी अधिकाऱ्याला तब्बल ५५ लाखांचा गंडा घातला आहे. संबंधित अधिकाऱ्याने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.
पोलिस पुढील तपास करत आहेत.
प्रशांत पाटील असे आत्महत्या करणाऱ्या कृषी अधिकाऱ्याचे नाव आहे. प्रशांत पाटील हे पालघर जिल्ह्यातील जव्हार पंचायत समितीमध्ये कृषी अधिकारी म्हणून कार्यरत होते. सध्या ते नाशिकमधील अंबड येथे राहत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फेसबुकवरील एका महिलेने प्रशांत पाटील यांना कमी किमतीत तेल खरेदी करून ते जास्त किमतीत विकून मोठा नफा मिळवण्याचे आमिष दाखवले होते. या आमिषाला बळी पडून पाटील यांनी ३० तोळे सोन्याचे दागिने विकले, तसेच कर्ज काढून ५५ लाख रुपये त्या महिलेला दिले होते. मात्र, त्यानंतर त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, त्यांनी टोकाचे पाऊल उचलले.
प्रशांत पाटील यांच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीनुसार, सायबर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. फसवणूक करणाऱ्या या महिलेचा शोध सायबर पोलिस घेत आहेत.
The post फेसबुकवरील महिलेच्या मैत्रीमुळे गेला अधिकाऱ्याचा जीव… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

