Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पिंपरी-चिंचवडमध्ये गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट, 5 जण होरपळले.

पिंपरी-चिंचवडमध्ये गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट, 5 जण होरपळले.

पुणेः पिंपरी-चिंचवडमध्ये घरगुती गॅसचा स्फोट झाला असून, स्फोटामध्ये पाच जण जखमी झाले आहेत. पिंपरीच्या बौद्ध नगरमध्ये आज (बुधवार) सकाळी ही घटना घडली आहे.

गॅसचा स्फोटात होरपळलेल्या पाच ही रुग्णांना आधी पालिकेच्या वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, त्यानंतर पुढील उपचारासाठी ससून रुग्णालयात हलविण्यात येत आहे.

स्फोट नेमका कशामुळे झाला, याचे कारण शोधले जाते आहे.

गॅस स्फोटमध्ये जखमी झालेल्यांची नावे पुढीलप्रमाणे :
1) मनोज कुमार वय 19
2) धीरज कुमार वय 23
3) गोविंद राम वय 28
4) राम चेलाराम वय 40
5) सत्येंदर राम वय 30

दरम्यान, गॅसचा स्फोट हा गॅस पाईप लिक झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka