Dailyhunt
पिंपरीमधील पोलिसकाकाचा बंदोबस्तावरून घरी जाताना अपघाती मृत्यू.

पिंपरीमधील पोलिसकाकाचा बंदोबस्तावरून घरी जाताना अपघाती मृत्यू.

पुणेः वर्षाखेरीस दिवस-रात्र बंदोबस्त करून पहाटे घरी जात असताना एका पोलिस उपनिरीक्षकाचा अपघाती मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज (बुधवार) पहाटे महाळुंगे येथे घडली आहे. जितेंद्र गिरनार असे मृत्यू झालेल्या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे.

जितेंद्र गिरनार हे महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात नेमणुकीस होते. वर्षाखेरीस ते दिवस-रात्र बंदोबस्तासाठी तैनात होते. बुधवारी पहाटे बंदोबस्त संपवून ते घरी निघाले होते. महिंद्रा कंपनी जवळ आले असता त्यांच्यासमोर एक कंटेनर जात होता. गिरनार यांच्या क्रेटा कारची कंटेनरला पाठीमागून धडक बसली. या अपघातात पोलिस उपनिरीक्षक गिरनार गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र गिरनार मागील काही वर्षांपासून पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात कार्यरत आहेत. पूर्वी ते वाकड पोलिस ठाण्यात नेमणुकीस होते. त्यानंतर मागील काही महिन्यांपूर्वी त्यांची महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात बदली झाली होती. वर्षाच्या सुरुवातीलाच काळाने त्यांच्यावर घाला घातला. गिरनार यांचे अपघाती निधन झाले. यामुळे कुटुंबियांवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

The post पिंपरीमधील पोलिसकाकाचा बंदोबस्तावरून घरी जाताना अपघाती मृत्यू… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka