पुणेः 'एक चित्रपटामध्ये पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली असून, डबिंग करत असताना अधिकाऱ्याच्या भूमिकेला अनेक प्रयत्न करूनही साजेसा असा आवाज निघत नव्हता. अखेर, पोलिस अधिकाऱ्याची वर्दी घातली आणि पहिल्याच टेकमध्ये घशातून आवाज बाहेर पडला.
‘स्पाईन-वाईज’ या मिहाना पब्लीकेशनच्या पुस्तक प्रकाशनावेळी अभिनेता सुबोध भावे बोलत होता. एक आठवण सांगताना तो म्हणाला, ‘एका चित्रपटामध्ये सहाय्यक पोलिस आयुक्ताची (एससीपी) भूमिका साकारली आहे. चित्रपटाच्या शुटिंगनतर डबिंगचे काम सुरू होते. परंतु, पोलिस अधिकाऱ्याला साजेसा असा आवाजच घशातून बाहेर पडत नव्हता. अनेक प्रयत्न करून झाले. गरम पाण्यासह विविध प्रयोग करून झाले. पण, घशातून हवा तसा आवाज काही बाहेर पडत नव्हता. तीन तास प्रयत्न सुरू होते. अखेर, थोडा शांत झालो आणि पोलिस अधिकाऱ्याची वर्दीची मागणी केली. पोलिस अधिकाऱ्याची वर्दी अंगावर चढवली आणि विशेष म्हणजे पहिल्याच टेकमध्ये हवा असलेला आवाज मिळाला. थोडक्यात, काय तर पोलिस, पोलिस अधिकाऱ्याच्या वर्दीमध्ये हत्तीचे बळ असते. पोलिसाची वर्दी एकदा का अंगावर चढली की हत्तीचं बळ येते.’
दरम्यान, सुबोध भावे याने आठवण सांगितल्यानंतर उपस्थितांनी टाळ्या वाजवून दाद दिली. यावेळी मा. अपर पोलिस अधीक्षक (सीआयडी, क्राईम) आणि प्रसिद्ध लेखक अशोक इंदलकर यांनी लिहीलेले ‘जेनिफर ऍण्ड दि बीस्ट’ हे इंग्रजी पुस्तक सुबोध भावे याला भेट दिले. अशोक इंदलकर यांनी आपली पोलिस अधिकारी आणि चित्रपट क्षेत्रातील मित्रांची ओळख सांगितल्यानंतर दोघांमध्ये चर्चा झाली.
The post पोलिस अधिकाऱ्याच्या वर्दीमध्ये हत्तीचं बळः सुबोध भावे appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

