Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पोलिस भरती दरम्यान आणखी एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू.

पोलिस भरती दरम्यान आणखी एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू.

पुणे : पुणे शहर पोलीस भरतीदरम्यान एक उमेदवार चक्कर येऊन पडला. त्याला तातडीने रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तुषार बबन भालके (वय 27, रा. कोठे बुद्रूक, ता.

संगमनेर, जि. अहमदनगर) असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. 5 दिवसांपूर्वीच मुंबईतही पोलिस भरतीदरम्यान जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील युवकाचा मृत्यू झाला होता.

पुणे येथे सुरू असलेल्या पोलिस भरती दरम्यान तुषार भालके धाव चाचणीत धावत असताना त्याला अचानक चक्कर आली आणि तो जमिनीवर पडला. दरम्यान त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले असता त्याचा उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे. या घटणेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. भालके कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळले आहे.


पुण्यात शिवाजीनगर पोलिस ग्राऊंडवर पोलिस भारती प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, आज (शनिवार) सकाळी 8 वाजताच्या सुमारास तुषार भालके या युवकाने रनिंगचे तीन राऊंड पूर्ण केले. पण धावत असताना त्याच्या पायात अचानक क्रँम्प आला, मस्सल ब्रेक झाले आणि तो जागीच कोसळला. त्यानंतर घटनास्थळी उपस्थित पोलिस भर्ती अधिकाऱ्यांनी तात्काळ त्याला अँम्ब्युलन्समधून पुण्यातील ससून रुग्णालयात नेले. पण डिहायड्रेशन होऊन प्रथम त्याच्या किडनी फेल झाल्या आणि मग ह्रदय बंद पडले. आणि त्यातच मल्टिपल ऑर्गन फेलुअर होऊन त्याचा उपचारादरम्यान दूर्दैवी अंत झाला. पोलिस भर्ती दरम्यान युवकाचा दुर्दैवी अंत होण्याची राज्यातली ही तिसरी घटना आहे. यापूर्वी एसआरपीएफच्या भर्तीत मुंबईत दोन युवक दगावले आहेत. त्यानंतर आज पुण्यात हा तिसरा प्रकार घडला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka