Dailyhunt
पोलिस स्टेशनमध्येच पोलिसकाकावर कुऱ्हाडीनं सपासप वार.

पोलिस स्टेशनमध्येच पोलिसकाकावर कुऱ्हाडीनं सपासप वार.

नागपूर : कपिल नगर पोलिस स्टेशनच्या आवारात सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या वाहानचालकावर कुऱ्हाडीने सपासप वार करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेत प्रफुल्ल जगदेवराव धर्माळे हे पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत.

उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

प्रफुल्ल जगदेवराव धर्माळे यांनी सहाय्यक पोलिस आयुक्तांना पोलिस स्टेशनच्या आवारात सोडल्यानंतर मोटार साफ करत असताना अचानक त्यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला झाला आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

धर्माळे हे नागपूरच्या सहाय्यक पोलिस आयुक्तांचे वाहनचालक आहेत. त्यांनी सहाय्यक आयुक्तांना वाहनातून कपिल नगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत सोडले. त्यानंतर ते तिथेच गाडी साफ करत असताना अचानक आरोपीने मागून त्यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला. त्यांचे लक्ष नसल्यामुळे दोन घाव बसले. मात्र तिसरा वार प्रफुल्ल यांनी हुकवला, त्यांनी आरडाओरड केल्यानंतर पोलिस स्टेशनमध्ये असलेले इतर पोलिस त्यांच्या मदतीला धावले. पोलिसांनी आरोपीला जागेवरच पकडले. दिलीप चुनकरे असे आरोपीचे नाव आहे. प्राथमिक चौकशीत त्याची मानसिक स्थिती बरोबर नसल्याची माहिती समोर आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

The post पोलिस स्टेशनमध्येच पोलिसकाकावर कुऱ्हाडीनं सपासप वार… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka