Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पोलिसकाकाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू.

पोलिसकाकाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू.

पुणेः पिंपरी-चिंचवडमध्ये पोलिस हवालदार सचिन नरोटे (वय ३८, रा. वाकड) यांना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी (ता. १५) रात्री साडेदहाच्या सुमारास मुंबई-बंगळुरू महामार्गावर ही घटना घडली आहे.

अज्ञात वाहनचालक फरार असून त्याचा शोध पिंपरी- चिंचवड पोलिस घेत आहेत. याप्रकरणी रावेत पोलिस ठाण्यात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन नरोटे हे देहू रोड पोलिस ठाण्यात कार्यरत होते. कर्तृत्वार असलेले नरोटे रात्री साडेदहाच्या सुमारास पुनावळे येथून देहूरोड पोलिस ठाण्याच्या दिशेने दुचाकीवरून जात होते. त्यांना अज्ञात वाहनाने जोरात धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, ज्या वाहनाने धडक दिली ते न थांबता निघून गेले. याप्रकरणी रावेत पोलिस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सचिन नरुटे यांच्या मागे पत्नी आणि दोन लहान मुली आहेत. सचिन नरुटे यांच्या अपघाती मृत्यूमुळे पोलिस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे.

The post पोलिसकाकाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka