Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पोलिसकाकाचा हर्सूल मध्यवर्ती कारागृहाच्यामागे ठेचून खून.

पोलिसकाकाचा हर्सूल मध्यवर्ती कारागृहाच्यामागे ठेचून खून.

त्रपती संभाजीनगर : हर्सूल मध्यवर्ती कारागृहातील पोलिस कर्मचाऱ्याचा खून झाल्याची घटना आज (सोमवार) सकाळी उघडकीस आली आहे. कारागृहामागे पोलिसाचा मृतदेह आढळून आला आहे. सिद्धार्थ बन्सीलाल जाधव (वय ४२), असे मृत पोलिसाचे नाव आहे, अशी माहिती हर्सूल पोलिस ठाण्याच्या निरीक्षक सुनीता मिसाळ यांनी दिली.

मृत सिद्धार्थ जाधव यांच्यासोबत असलेले त्यांचे मित्र सचिन दाभाडे हे सुद्धा या घटनेत जखमी झाले आहेत. त्यांच्यावर घाटीमध्ये उपचार सुरू आहेत. सचिन दाभाडे व मृत सिद्धार्थ जाधव हे दोघे कारागृहाच्या मैदानावर एकत्र बसले होते. त्याच दरम्यान हल्ला झाल्याची माहिती पुढे आली आहे. खुनाच्या घटनेमागचे नेमके कारण सायंकाळपर्यंत स्पष्ट झाले नाही. घटनास्थळी रक्ताचे डाग दिसून आले. यातून ठेचून खून करण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे.

सिद्धार्थला ठेचून मारले तर सचिन यांनाही मारताना ते बचावासाठी पळाले. सचिन सध्या बेशुद्धावस्थेत असून घाटी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान हा खरच कोणी केलेला हल्ला होता की त्यांच्या मित्राचाच सिद्धार्थ याना मारण्याचा कट होता. याचा शोध पोलिस घेत आहेत. तसेच घटनेचा पुढील तपास हर्सुल पोलिस करत आहेत.

घटनास्थळी पोलिस निरीक्षक मिसाळ यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिली. पंचनामा करून शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह घाटीत पाठविण्यात आला आहे.. मृत सिद्धार्थ यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, मुलगी, दोन भाऊ असा परिवार आहे. सिद्धार्थ जाधव यांच्या मृत्यूमुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

The post पोलिसकाकाचा हर्सूल मध्यवर्ती कारागृहाच्यामागे ठेचून खून… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka