चंदीगड (हरियाणा) : कर्नाला चालण्यासाठी बाहेर पडलेल्या क्राइम ब्रांचच्या ASI अधिकाऱ्याची गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. यमुनानगर परिसरात घरापासून काही अंतरावर अज्ञातांनी गोळ्या झाडल्या आहेत.
संजीव यांचं काही महिन्यांपूर्वी ऑपरेशन झाले होते. ते कामावरुन घरी आल्यानंतर काही वेळाने चालायला पुन्हा बाहेर पडले. यावेळी अज्ञातांनी त्यांच्यावर गाळीबार केला आणि घटनास्थळावरून पळ काढला. एक गोळी डोक्यात तर दुसरी कंबरेला लागली. त्यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात स्थानिकांच्या मदतीने उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेनंतर पोलिस आणि सीआयएचे पथक घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळावरुन गोळ्यांचे शेल जप्त करण्यात आले आहेत.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच कुटुंबावर शोककळा पसरली आहे. काही दिवसांपूर्वी संजीव यांचा भाऊ आणि वडिलांचेही निधन झाले होते. कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावरच होती. पोलिसांनी आजूबाजूचे सीसीटीव्ही फुजेज तपासले आहे. पोलिसांकडून अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
The post पोलिसकाकाची घराजवळच गोळ्या झाडून निर्घृण हत्या… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

