मुंबई : मुंबईच्या नागपाडा पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या पोलिसाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कैलास टेकवडे असे आत्महत्या केलेल्या पोलिसाचे नाव आहे. या घटनेमुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
अर्नाळ्यामध्ये राहणाऱ्या कैलास टेकवडे यांनी त्यांच्या राहत्या घरी आत्महत्या केली. दोन ते तीन दिवसांपासून त्यांचा संपर्क होत नव्हता, त्यामुळे वरळीमध्ये राहणारे त्यांचे भाऊ आणि मुलगी यांनी अर्नाळा यथील घर गेले. या दोघांना कैलास टेकवडे यांच्या अर्नाळ्याच्या घराचा दरवाजा बंद दिसला. दरवाजा उघडल्यानंतर कैलास यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत त्यांना दिसल्यावर धक्का बसला. कैलास टेकवडे यांचा मृतदेह दिसल्यानंतर लगचेच त्यांच्या भावाने पोलिसात धाव घेतली. यानंतर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे.
कैलास टेकवडे हे मागच्या 25 वर्षांपासून मुंबई पोलिस दलात कार्यरत आहेत. मागच्या पाच वर्षांपासून ते एकटेच अर्नाळ्याच्या घरात राहत होते. त्यांची पत्नी आणि मुलगी पाच वर्षांपासून त्यांच्यासोबत राहत नव्हत्या, अशी माहिती समोर आली आहे. कैलास टेकवडे यांच्या घरामध्ये कोणतीही चिठ्ठी आढळली नाही, त्यामुळे पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.
The post पोलिसकाकाने घेतला जगाचा निरोप; कुटुंबियांना धक्का… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

