Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पोलिसकाकाने कर्तव्यावर असताना स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या.

पोलिसकाकाने कर्तव्यावर असताना स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या.

गोंदिया: कर्तव्यावर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना गोंदियामध्ये घडली आहे. गोंदियाच्या नवेगावबांध पोलिस स्टेशन हद्दीतील धाबेपवनी AOP मध्ये ही घटना घडली आहे.

पोलिस कर्मचाऱ्याच्या हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र, कर्माचाऱ्याने टोकाचं पाऊल उचलल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

गोंदिया जिल्ह्यात नक्षलग्रस्त भागामध्ये नक्षल गतीविधीवर नजर ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात AOP बांधण्यात आल्या आहेत. नवेगावबांध पोलिस स्टेशन जवळ असलेल्या धाबेपवनी येथील AOP सेंटर मधील हवालदार तेजराम कोरोटी यांनी आत्महत्या केली आहे. त्यांनी आपल्याजवळ असलेल्या बंदूकाने गोळी झाडत आत्महत्या केली. या घटनेमुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

पोलिस कर्मचाऱ्याने आत्महत्येचे कारण अद्याप पुढे आलेले नाही. मात्र, त्यांची बदली तिरोडा पोलिस स्टेशन येथे झाल्याने त्यांनी आत्महत्या केली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

The post पोलिसकाकाने कर्तव्यावर असताना स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka