बंगळुरू : प्रसिद्ध कन्नड अभिनेता दर्शन थुगुदीपा याला खुनाच्या आरोपाखाली बंगळुरू पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
रेनुकास्वामी नावाच्या एका व्यक्तीची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी अभिनेता दर्शन शूगुदीपा याला अटक केली आहे.
पोलिस उपायुक्त एस गिरीश यांनी या घटनेची माहिती दिली आहे. अभिनेत्याला त्याच्या मूळ गावी असलेल्या म्हैसूरमधील चामराजेंद्र प्राणी उद्यानाजवळील एका हॉटेलमधून ताब्यात घेण्यात आले आहे. याबबातचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

The post प्रसिद्ध अभिनेत्याला खुनाच्या आरोपाखाली अटक… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

