Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
प्रेम! मुलीसाठी शोधला जावई अन् जावयाला आवडली मुलीची आई.

प्रेम! मुलीसाठी शोधला जावई अन् जावयाला आवडली मुलीची आई.

खनौ (उत्तर प्रदेश): मुलीसाठी मुलगा शोधल्यानंतर लग्नाची तयारी सुरू झाली. पण, मधल्या काळामध्ये मुलीची आई आणि जावयामध्ये प्रेमसंबध निर्माण झाले आणि दोघांनी पळ काढल्याची घटना अलीगडमध्ये घडली आहे.

या घटनेची परिसरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

अलिगड जिल्ह्यातील मद्रक पोलीस स्टेशन परिसरातील मनोहरपूर गावात ही घटना घडली आहे. जितेंद्र कुमार नावाच्या व्यक्तीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत म्हटले आहे की, त्याची पत्नी आणि त्याच्या मुलीचा होणारा वर लग्नापूर्वी घरातून पळून गेले आहेत. दोघांनी पळून जाण्यापूर्वी घरातून सुमारे ३.५ लाख रुपये रोख आणि सुमारे ५ लाख रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिने सोबत नेले आहेत.’

जितेंद्र कुमार यांच्या मुलीचे लग्न १६ एप्रिल रोजी निश्चित झाले होते. लग्नाची तयारी जोरात सुरू होती. नातेवाईकांना निमंत्रण पत्रिका वाटण्यात आल्या होत्या आणि घरात लग्नाचे वातावरण होते. पण अचानक एके दिवशी त्याची पत्नी घरातून गायब झाली. सुरुवातीला सर्वांना वाटले की ती एखाद्या नातेवाईकाच्या घरी गेली असावी, पण बराच वेळ होऊनही ती परत न आल्याने तिचा शोध सुरू झाला. दरम्यान, मुलीचे लग्न निश्चित झाले होते तो युवकही अचानक गायब झाल्याचे समोर आले. नातेवाईकांनी चौकशी केल्यानंतर आणि मोबाईलची माहिती मिळवल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली. पत्नी आणि तिचा होणारा जावई एकत्र पळून गेले होते. जावयाने दिलेल्या मोबाईलवर दोघे २० तासांहून अधिक काळ एकमेकांशी बोलत असल्याची माहिती पुढे आली आहे.

‘माझ्या आईने माझ्यासोबत जे काही केलं ते कुणीही आई करणार नाही. ती माझ्यासाठी मेली आहे. ते दोघेही जगले किंवा मेले तरी मला फरक पडत नाही’, अशी संतप्त प्रतिक्रिया मुलीने दिली आहे. दुसरीकडे माझी पत्नी वधूचे दागिने आणि लाखो रुपयांची रोकड घेऊन पळाली आहे, आम्हाला दागिने आणि रोकड परत हवी आहे. ती कुणासोबतही कुछेही राहू शकते, माझ्याकडून आमचं नातं संपलं आहे. पहिल्यांदा तुझी बायको माझ्यासोबत नाही, असे तो म्हणाला, पण नंतर त्याने ती माझ्यासोबत असल्याचे मान्य केले. ती तुझ्यासोबत 20 वर्ष राहिली, आता तिला विसरून जा, असे तो मला म्हणाल्याचे महिलेचा पती जितेंद्र यांनी सांगितले.

दरम्यान, सासू आणि जावयाने पळ काढल्यानंतर नागरिकांमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे. पण, घरातील सोने आणि पैसे नेल्यामुळे कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. शिवाय, बदनामी झाल्यामुळे कुटुंबियांनी संताप व्यक्त केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

सहाच महिन्यांपुर्वी लग्न झालेल्या सुनेने काढला सासूचा काटा; कारण आले समोर…

सासू आणि जावयाच्या प्रेमसंबधातून बाळाचा झाला जन्म अन् पुढे…

सासरा आणि सुनेचे अनैतिक संबंध अन् गप्प राहिलेल्या सासूने अखेर…

नवविवाहितेला नको त्या अवस्थेत सासूने पाहिले अन् बसला धक्का; युवक निघाला…

जावई म्हणतो सासूला; मला तुझ्याशीच लग्न करायचेय…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka