Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
प्रेमाचा त्रिकोण! प्रियकरासाठी सपासप वार करून एकीने दुसरीला संपवलं.

प्रेमाचा त्रिकोण! प्रियकरासाठी सपासप वार करून एकीने दुसरीला संपवलं.

मरावती : प्रेम प्रकरणामधून एका युवतीने दुसऱ्या युवतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना राजापेठ ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. शुभांगी काळे (वय २६, रा. आर्वी, जि. वर्धा) असे मृत्यू झालेल्या युवतीचे नाव आहे.

पोलिस पुढील तपास करत आहेत.

अमरावतीमध्ये सोसायटीच्या मागे शुभांगीवर सपासप चाकूने वार करण्यात आले, यानंतर शुभांगीने आरडाओरडा केला, त्यामुळे हल्ला करणारी दुसरी युवती तिथून पसार झाली. परिसरातील नागरिकांनी शुभांगी हिला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, तिथे तिला मृत घोषित करण्यात आले. शुभांगी हिची हत्या माया नगर येथील रहिवासी असलेल्या 25 वर्षांच्या युवतीने केली असल्याचा पोलिसांना संशय आहे. याप्रकरणी पोलिसांनी विकास सुरज नावाच्या युवकाला ताब्यात घेतले आहे. तर आरोपी युवती सध्या फरार असून, पोलिस तिचा शोध घेत आहेत.

शुभांगी आणि हत्या करणारी युवती या दोघींचेही एकाच युवकावर प्रेम होते. या प्रेम प्रकरणातूनच शुभांगीची हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

प्रेमाचा त्रिकोण! पोलिस उप निरीक्षकाला फोन करुन बोलावले आणि कारखाली चिरडले…

त्रिकोणी प्रेमकथा! मुलीचे एकाच वेळी दोघांशी प्रेमसंबध अन् पुढे…

पोलिसांनाही धक्का! दोन युवक युवतींना सहज आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढायचे…

प्रेम प्रकरण! पती-पत्नी म्हणून ओयो हॉटेलमध्ये आले अन्…

मामाच्या मुलीसाठी सख्ख्या भावांची हाणामारी; पण तिचं प्रेम…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka