Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
प्रेमसंबंध! दीर पहाटेच्या सुमारास वहिनीच्या खोलीत घुसला अन्.

प्रेमसंबंध! दीर पहाटेच्या सुमारास वहिनीच्या खोलीत घुसला अन्.

भंडारा : प्रेमसंबंध असलेल्या वहिनीने लग्नाला नकार दिल्याने दीरानं वहिनीची हत्या केल्याची घटना लाखांदूर तालुक्यातील भागडी येथे घडली आहे. त्यानंतर पळून गेलेला आरोपी गौरव अंबादे याला लाखांदूर पोलिसांनी चंद्रपूरच्या ब्रम्हपुरीतून अटक केली आहे.

माधुरी तुळसीदास अंबादे (३०, रा. ब्रह्मपुरी) असे मृत महिलेचे नाव आहे.

मृत महिलेच्या पतीचं काही वर्षांपूर्वी निधन झाले असून तिला आठ वर्षाची मुलगी आहे. दरम्यान, महिलेचं नात्याने दीर असलेल्या गौरव अंबादे याच्याशी प्रेमसंबंध जुळले. गौरवनं वहिनी माधुरीला लग्न करण्याची मागणी केली. वहिनीनं लग्नास नकार दिल्यामुळे गौरवनं दुसऱ्या मुलीशी लग्न करण्याचे ठरवले. मात्र, जमलेले लग्न वहिनीनं तोडले आणि स्वतःही विवाह करीत नाही, हा राग मनात पकडून गौरवने वहिनीचा भंडाऱ्याच्या भागडी गावात धारदार चाकूने वार केले आणि त्यानंतर उशीनं तोंड दाबून हत्या केल्याची कबुली आरोपी गौरवने पोलिस तपासात कबुली दिली. घटनास्थळावरून फरार झालेल्या आरोपी गौरवला लाखांदूर पोलिसांनी ब्रम्हपुरीतून अटक केली आहे.

 Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

लाखांदूर तालुक्यातील भागडी येथे रविवारी (ता. २६) पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. ब्रह्मपुरी येथील ३० वर्षीय महिलेची तिच्याच दिराने धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून हत्या केली आहे. ही थरकाप उडवणारी घटना महिलेच्या लहान मुलीसमोर घडल्याची माहिती समोर आली आहे. घटनेनंतर दुचाकीवरून फरार झालेल्या आरोपी गौरव अंबादे याला पोलिसांनी पकडले असून, पुढील तपास करत आहेत.

प्रेमसंबंधातून वहिनीची हत्या करुन रस्त्यावर नग्न धावला दीर अन्…

धक्कादायक! भावाला मारलं अन् गर्भवती वहिनीवर केला बलात्कार…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka