Dailyhunt
प्रेयसीच्या चितेवर घेतली प्रियकराने उडी.

प्रेयसीच्या चितेवर घेतली प्रियकराने उडी.

नागपूर : प्रेयसीने गळफास घेऊन जीवन संपविलेनंतर अंत्यसंस्कारादरम्यान तिच्या चितेवर उडी घेत प्रियकरानेही जीवन संपविण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. यावेळी नागरिकांनी केलेल्या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

प्रेयसीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार सुरू असताना मद्यधुंद प्रियकराने तिच्या चितेवर उडी घेण्याचा प्रयत्न केला. प्रियकराने उडी मारण्याचा प्रयत्न करताच उपस्थित नागरिकांनी त्याला मागे खेचले व त्याला चोप दिला. नागरिकांनी केलेल्या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. अनुराग राजेंद्र मेश्राम (वय २७, रा. हनुमान नगर , ता. पारशिवनी) असे या युवकाचे नाव आहे. कामठी तालुक्यातील नवीन कामठी पोलिस ठाणे हद्दीतील कन्हान नदी शांती घाट येथे सोमवारी (ता. ९) ही घटना घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत अंशिका नितीन खोब्रागडे (वय १९, रा. हनुमान नगर, ता. पारशिवनी) या युवतीचे त्याच परिसरात राहणाऱ्या अनुराग मेश्राम (वय २७) या युवकासोबत प्रेमसंबंध होते. प्रेम प्रकरणात नैराश्य आल्याने अंशिका हिने रविवारी (ता. ८) सायंकाळी सातच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. अंशिकाच्या लहान बहिणीने वडील व आईला घटनेची माहिती देताच वडिलांनी शेजाऱ्याला बोलवून अंशिकाला खाली उतरवून कामठी येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. तिच्यावर सोमवारी (ता. ९) दुपारी चार वाजता कन्हान नदी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तिच्यावर अंत्यसंस्कार सुरू असताना अनुराग याने पेटत्या चितेत उडी घेण्याचा प्रयत्न केला. नागरिकांनी त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तरीही त्याने पुन्हा चितेवर उडी घेण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान त्या ठिकाणी उपस्थित नागरिकांनी त्याला मागे खेचत मारहाण केली. मारहाणीत जखमी झाल्याने त्याला कामठी येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.

प्रियकराला रात्रीच्या वेळी भेटण्यासाठी आईला झोपेच्या गोळ्या द्यायची अन्…

लग्नाच्या दिवशीच नवरीच्या प्रियकराने केला नवरदेवाचा खून…

पुणे! आईने स्वतःचं प्रेमप्रकरण लपविण्यासाठी प्रियकराला मुलीसोबत ठेवायला लावले अनैतिक संबंध…

प्रियकराने कारागृहात जाण्यापूर्वीच प्रेयसीसोबत उचललं टोकाचं पाऊल…

नवविवाहितीने प्रियकरासोबत ठोकली धूम; शिवाय पळून जाताना…

The post प्रेयसीच्या चितेवर घेतली प्रियकराने उडी… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka