Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
प्रियकरसाठी मातेने केली स्वतःच्या मुलीची गळा चिरून हत्या.

प्रियकरसाठी मातेने केली स्वतःच्या मुलीची गळा चिरून हत्या.

खनौ (उत्तर प्रदेश) : अनैतिक संबंधातून एका महिलेने आपल्याच तीन वर्षांच्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना मुजफ्फरपुरमध्ये घडली आहे. मिठनपुरा पोलिसांनी याप्रकरणी मुलीची आई काजल हिला तिच्या प्रियकराच्या अटक केली आहे.

मिष्ठी (वय ३) असे हत्या झालेल्या चिमुकलीचे नाव आहे.

24 ऑगस्ट 2024 ला शास्त्री नगरमध्ये एक चिमुरडीचा मृतदेह लाल रंगाचा सूटकेसमध्ये आढळला होता. यानंतर एकच खळबळ उडाली होती. स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यावर पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते.

शहर पोलिस अधीक्षक अवधेश दीक्षित यांनी सांगितले की, ‘काजल हिचे रामपुरी येथील एका युवकासोबत प्रेम संबंध होते. काजल हिला आपला पती मनोजला सोडून प्रियकरासोबत राहायचे होते. मात्र, तिच्या प्रियकराला मिष्टीला सोबत ठेवायचे नव्हते. मिष्ठीला सोबत ठेवण्यासाठी तो तयार नव्हता. काजल नेहमी ‘क्राइम पेट्रोल’ सीरियल पाहायची. त्यातून प्रेरित होऊन तिने आपली मुलगी मिष्टीची चाकूने गळा चिरत हत्या केली. यानंतर आपल्या मुलीचा मृतदेह सूटकेसमध्ये ठेवला आणि छतावरुन फेकून दिला. घरात आणि छतावर पडलेले रक्ताचे डाग धुतले. तसेच ती मावशीच्या घरी वाढदिवसाच्या पार्टीला जात आहे, असे आपल्या पतीला खोटे बोलली होती.

मिठनपुरा पोलिस निरीक्षक राम एकबाल प्रसाद यांनी आपल्या टीमसह तत्काळ या प्रकरणाची तपासचक्रे फिरवली. श्वानपथकालाही बोलवण्यात आले. तपासादरम्यान पथकाला मुलीच्या घरातून आणि गच्चीवरून रक्ताचे डाग आढळल्यावर त्याचे नमुने जमा केले. दुसरीकडे मिष्टीचे वडील मनोज यांनी काजल विरोधात एफआयआर नोंदवला होता. पोलिसांनी आरोपी महिलेला अटक करण्यासाठी छापे टाकणे सुरू केले होते. पोलिसांनी काजलला रामपुरी येथून तिच्या प्रियकराच्या घरुन अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.

नवविवाहीत डॉक्टर युवतीने घेतला जगाचा निरोप; सुसाइट नोट मध्ये म्हटले की…

पोलिसाचे स्वप्न राहिले अधुरे; प्रेयसीला व्हिडिओ कॉल केला अन्…

अनैतिक संबंध! प्रियकराने केली प्रेयसीची दगडाने ठेचून हत्या…

पोलिस पत्नीचे अनैतिक संबंध अन् पाच जणांचा मृत्यू; सुसाईड नोट मिळाली…

वहिनी आणि दिराचे अनैतिक संबंध! नवऱ्याला चहा द्यायची अन्…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka