Dailyhunt
पुणे! आमच्या आधी मटण का खालं? मित्राने घातला डोक्यात फावडा.

पुणे! आमच्या आधी मटण का खालं? मित्राने घातला डोक्यात फावडा.

पुणेः आमच्या आधी मटण का खाल्लं म्हणत मित्रानेच मित्रावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी धम्मपाल सोनवणे याच्यावर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

न्यू इयर पार्टीमध्ये मटण खाल्ल्यावरून 2 मित्रांमध्ये वाद झाला आणि त्यानंतर मित्रानेच मित्राच्या डोक्यात फावडा घातल्याची घटना भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या हल्लात निगेश म्हेथे हा युवक जखमी झाला आहे. याप्रकरणी धम्मपाल सोनवणे याच्यावर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

निगेश म्हेत्रे व धम्मपाल सोनवणे हे दोघे ही एकमेकांचे मित्र असून खासगी गाड्यांवर चालक म्हणून काम करतात. शिवाय, दोघेही एकाच खोलीत वास्तव्यास आहेत. नवीन वर्षाच्या निमित्ताने ते पार्टी करत होते. म्हेत्रे तू आमच्या अगोदर मटण का खातोस? या कारणावरुन त्यांच्यात वाद झाला. रागाच्या भरात सोनवणे याने म्हेत्रे याला शिवीगाळ करत फावडयाचे दांडक्याने त्याच्या डोक्यात मारहाण केली. या हल्ल्यात निगेश म्हेथे हा जखमी झाला आहे. निगेश म्हेथे याने गुन्हा दाखल केला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

पुणे शहरातील पोलिसकाकाच्या प्रसंगावधानाने वाचले युवतीचे प्राण!

पुणे शहरातील कात्रज घाटात गोळीबार; कारण समोर…

धक्कादायक! पुणे शहरात शिक्षिकेने शाळेतच ठेवले विद्यार्थ्यासोबत शारीरिक संबंध…

पुणे शहरात आईच्या डोळ्यादेखत मुलीचे एकतर्फी प्रेमातून अपहरण…

पुणे शहरात अनैतिक संबंधाच्या संशयावरून भर रस्त्यात कुऱ्हाडीने हल्ला…

The post पुणे! आमच्या आधी मटण का खालं? मित्राने घातला डोक्यात फावडा… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka