Dailyhunt
पुणे अपघात प्रकरणातील अगरवाल कुटुंबाच्या अडचणीत वाढ; खुनाचा गुन्हा दाखल.

पुणे अपघात प्रकरणातील अगरवाल कुटुंबाच्या अडचणीत वाढ; खुनाचा गुन्हा दाखल.

पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगर परिसरात धनिकपुत्र अल्पवयीन मुलाने महागडी पोर्शे कार वेगाने चालवत दुचाकीस्वार तरुण आणि तरुणीला चिरडल्याची घटना घडली होती.

अपघाताच्या घटनेनंतर धनिकपुत्र अल्पवयीन मुलाला लगेचच जामीन मिळाल्याने वातावरण चांगलंच तापले होते.

अखेर अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द करून त्याची रवानगी बालसुधार गृहात करण्यात आली. अल्पवयीन आरोपीची आई, वडील आणि आजोबा देखील कोठडीमध्ये आहेत. दरम्यान या प्रकरणात दररोज नव नवीन खुलासे होत आहेत.

आता अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अगरवाल यांचा पाय आणखी खोलात गेला आहे. विशाल अगरवाल आणि मुलाचे आजोबा सुरेंद्र अगरवाल यांच्यावर एका व्यावसायिकाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्याणीनगर अपघातप्रकरणी चर्चेत असलेल्या अगरवाल पिता-पुत्रासह पाच जणांवर बांधकाम व्यावसायिकाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे आता अगरवाल पिता-पुत्राच्या अडचणींमध्ये आणखी वाढ झाली आहे.

सावकारी कर्जाला कंटाळून वडगाव शेरी येथे राहणाऱ्या 41 वर्षीय बांधकाम व्यावसायिकाने 9 जानेवारी रोजी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली होती. याप्रकरणी विनय विष्णुपंत काळे याच्यावर जानेवारीत महिन्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, गुन्ह्याच्या तपासात सुरेंद्रकुमार अगरवाल, रामकुमार अगरवाल, विशाल अगरवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी रवी हुडलानी आणि मुकेश झेंडे यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांच्यावर भादंवि 306, 504 आणि 506 नुसार चंदननगर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

The post पुणे अपघात प्रकरणातील अगरवाल कुटुंबाच्या अडचणीत वाढ; खुनाचा गुन्हा दाखल… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka