पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगर येथे महागड्या पोर्शे कारने दोघांना चिलडल्यानंतर अपघातातील धनिकपुत्र अल्पवयीन चालकाला वाचविण्यासाठी प्रयत्न झाले आहेत. ससून रुग्णालयात तर अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुनेच बदलल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
अल्पवयीन धनिकपुत्र असलेल्या अल्पवयीन आरोपीवर पोलिसांकडून करण्यात आलेली कारवाई, त्यानंतर त्याला मिळालेला जामीन यावरुन हे प्रकरण केवळ राज्यातच नाहीतर संपूर्ण देशभरात गाजले आहे. याच अपघात प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. प्रसिद्ध बिल्डर विशाल अगरवाल याने पुत्राला वाचविण्यासाठी नको नको ते प्रयत्न केले आहेत. अपघातानंतर ताब्यात घेतलेल्या धनिकपुत्राच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले. मात्र, हे रक्ताचे नमुने कचऱ्याच्या डब्ब्यात टाकून त्याबदली दुसऱ्याच तरुणाच्या रक्ताचे नमुने त्याच्या जागी ठेवल्याचे कृत्य ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांनी केले. दोघांनाही गुन्हे शाखेनं ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. त्यासोबतच ससूनमधीलच शिपाई अमित घटकांबळे यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पुणे ससून हॉस्पिटल प्रकरणी गुन्हे शाखेकडून पकडलेल्या डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हळणोर आणि शिपाई अमित घटकांबळे यांची सखोल चौकशी सुरू आहे. अतुल घटकांबळे याच्याकडून पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने 50 हजार रुपये जप्त केले, तर दुसऱ्या बाजूला डॉ. श्रीहरी हळनोर यांच्याकडून 2.5 लाख रुपये जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. आता ही रक्कम कोणी घटकांबळेला कोणी दिली? याचा शोध सुरू आहे. या तिन्ही आरोपींनी 30 मेपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
पुणे अपघात प्रकरणी ससुनमधील ज्या डॉक्टरांना ताब्यात घेण्यात आले आहे. ते दोघेही सुरुवातीला गुन्ह्याची कबुली देत नव्हते, मात्र, पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवला आणि दोघांनी घडाघडा सगळं सांगायला सुरुवात केली. पोलिसांनी फैलावर घेताच डॉ. हळनोर याने बिल्डर विशाल अगरवाल याच्याकडून तब्बल तीन लाख रुपयांची लाच घेऊन रक्ताच्या नमुन्यात फेरफार केल्याची कबुली दिली. पण, दुसरा डॉक्टर ड. अजय तावरे याने यासाठी किती पैसे घेतले, हे अद्याप समोर आलेले नाही. पोलिस याप्रकरणी कसून चौकशी करत आहेत. तर दोन डॉक्टरांसोबतच एका शिपायालाही पोलिसांनी ताब्यात घेतले होतं. या शिपायाच्या घराची झाडाझडती घेतली. त्यावेळी या शिपायानं त्याला मिळालेले पैसे शेजाऱ्यांकडे ठेवायला दिल्याची बाब समोर आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
The post पुणे अपघातातील धनिकपुत्राचे ब्लड सॅम्पल बदलणारा डॉक्टर लागला घडाघडा बोलायला… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

