Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पुणे! दिपक मानकर यांनी केली पोलिसांची दिशाभूल; गुन्हा दाखल.

पुणे! दिपक मानकर यांनी केली पोलिसांची दिशाभूल; गुन्हा दाखल.

पुणे: अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दिपक मानकर यांच्यावर बनावट कागदपत्रे सादर करुन पोलिसांची दिशाभूल केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्यांक विभागाचे राज्य उपाध्यक्ष असलेल्या शंतनू कुकडे याला पुणे पोलिसांनी काही महिलांच्या तक्रारीनंतर बलात्कार प्रकरणात अटक करण्यात आली होती.

या प्रकरणात अनेकांचा सहभाग आढळून आल्याने पोलिसांनी शंतनू कुकडे याच्या बँक खात्यांची पडताळणी केली. त्यावेळी शंतनू कुकडे आणि दिपक मानकर यांच्यात एक कोटी रुपयांची देवाणघेवाण झाल्याचे आढळून आले होते.

फक्त पोलिसांसाठी! 'सेवानिवृत्तीनंतर पण मस्त चाललंय आमचं!'

पोलिसांनी याबाबत दिपक मानकर यांना चौकशीला बोलावले असता त्यांनी शंतनू कुकडे सोबत कोणतेही आर्थिक व्यवहार नसल्याचा दावा करत काही कागदपत्रे पोलिसांसमोर सादर केली. पोलिसांनी दिपक मानकरने सादर केलेल्या कागदपत्रांची सत्यता तपासली असता ती कागदपत्रे बनावट असल्याचे आढळून आले. त्यानंतर दिपक मानकरच्या विरोधात बनावट कागदपत्रे सादर करुन पोलिसांची फसवणूक केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिपक मानकर यांना यापूर्वी अनेक प्रकरणांमध्ये अटक झाल्याने त्यांना तुरुंगवारी घडली आहे.

दीपक मानकर यांच्या विरोधात समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपुर्वी वादग्रस्त शंतनू कुकडे प्रकरणात देखील दीपक मानकर यांची चौकशी झाली होती. आता बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने जमीन व्यवहार केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजित पवार पुण्याचे पालकमंत्री असताना त्यांच्या पक्षाच्या शहराध्यक्षावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पुणे! पाकिस्तानला पाठिंबा देणारी विद्यार्थिनी अटकेत; कोर्टात 'डुप्लिकेट' ड्रामामुळे खळबळ…

पुणे! दाजीने केला घटस्फोटित मेव्हणीच्या प्रेमाला विरोध अन् नको ते घडलं…

पुणे शहरातील लॉज मालकांना आणि लॉजवर जाणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी…

पुणे शहरात बनावट नोटा छापणा-या टोळीचा सायबर पथकाकडून पर्दाफाश…

पुणे! आईने 10 वर्षांनी झालेल्या दोन चिमुकल्यांना पाण्याच्या टाकीत बुडवून मारलं अन्…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka