Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पुणे! गर्भवतीच्या उपचारासाठी रग्णालयाने मागितले 10 लाख, महिलेचा मृत्यू.

पुणे! गर्भवतीच्या उपचारासाठी रग्णालयाने मागितले 10 लाख, महिलेचा मृत्यू.

पुणे: पुणे शहरातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने उपचारासाठी १० लाख रुपयांची मागणी करत वेळेत दाखल करून न घेतल्याने एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

तनिषा सुशांत भिसे (वय २७) या गर्भवती महिलेने जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर उपचाराअभावी आपला जीव गमावला. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

तनिषा भिसे यांना प्रसूतीसंबंधी तातडीचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना तातडीने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, हॉस्पिटल प्रशासनाने १० लाख रुपयांच्या डिपॉझिटची मागणी केली. रुग्णाचे कुटुंब अडीच लाख रुपये भरायला तयार होते. मात्र, तरीही हॉस्पिटलने रुग्णाला दाखल करून घेतले नाही. दरम्यानच्या वेळात थेट मंत्रालयातून रुग्णालयाला फोन गेले. मात्र तरीही रुग्णालय प्रशासन ऐकायला तयार नव्हते. अखेर कुटुंबीयांना रुग्णाला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलविण्याचा निर्णय घ्यावा लागला. मात्र, याच प्रक्रियेत वेळ गेल्याने आणि उपचार मिळाण्यास उशीर झाल्याने तनिषा भिसे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तत्पूर्वी पिंपरी चिंचवडमधील एका रुग्णालयात महिलेने जुळ्या बाळांना जन्म दिला. मात्र प्रचंड रक्तस्त्रावामुळे महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे.

तनिषा भिसे यांचे पती सुशांत भिसे हे भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक आहेत. प्रशासनाच्या हलगर्जीपणाविरोधात त्यांनीही तीव्र संताप व्यक्त केला आहे. येत्या अधिवेशनात यावर मी आवाज उठविणार असल्याचे आमदार गोरखे यांनी सांगितले. या घटनेबाबत आमदार अमित गोरखे यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रारही केली आहे. रुग्णास योग्य वेळी उपचार न मिळाल्याने आणि अवास्तव बिलाची मागणी केल्याने रुग्णालय प्रशासनावर कठोर कारवाई करण्याची मागणी कुटुंबीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत. रुग्णालय प्रशासनाने यावर अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण दिलेले नाही.

रुबी हॉल रुग्णालयातील महिला कर्मचाऱयाची आत्महत्या; एचआर हेडसह दोघांविरुद्ध गुन्हा…

खाजगी रुग्णालयात गेलेल्या महिलेचा तासाभरातच मृत्यू…

ससूनचा कारभार! दिशा भोईटे प्रकरण अद्याप संपलेले नाही…

दिशा भोईटे हिचा वैद्यकीय खून समजावा का?

मुलाच्या मृत्यूनंतर तब्बल 11 दिवस ठेवले व्हेंटिलेटरवर; सहा डॉक्टरांवर गुन्हा दाखल…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka