Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पुणे! घायवळ टोळीकडून कोयत्याने वार, हल्ल्याचा सूत्रधाराला मुंबईतून केली अटक.

पुणे! घायवळ टोळीकडून कोयत्याने वार, हल्ल्याचा सूत्रधाराला मुंबईतून केली अटक.

पुणे : पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ टोळीच्या गुंडांनी तीन दिवसांपूर्वी कर्वेनगर परिसरात एका व्यावसायिकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला होता. या हल्ल्याचा थरकाप उडवणारा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे.

या घटनेनं संपूर्ण पुणे शहर हादरलं होते. पुणे पोलिसांनी अत्यंत शिताफीने या हल्ल्याचा म्होरक्या प्रशांत धुमाळ याला मुंबईमधून बेड्या ठोकल्या आहेत.

पुण्यातील कर्वे रोडवर असलेल्या प्रसिद्ध 'कोकण एक्सप्रेस' हॉटेलसमोर मंगळवारी सायंकाळी ही थरारक घटना घडली होती. अमित शिंदे असे हल्ला झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. त्यांचा मोबाईल विक्रीचा व्यवसाय आहे. मंगळवारी सायंकाळी अमित शिंदे हे आपल्या दुकानाबाहेर उभे असताना, अचानक ८ ते १० जणांच्या टोळक्याने त्यांच्यावर हल्ला चढवला. या गुंडांनी अमित यांच्यावर कोयत्याने सपासप वार करत त्यांना गंभीर जखमी केले आणि परिसरात दहशत निर्माण केली. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली होती.

अमित शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी गुंड निलेश घायवळ याच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. याच गोष्टीचा राग मनात धरून घायवळ टोळीतील गुंडांनी अमित यांच्यावर हा पूर्वनियोजित आणि अत्यंत घातक हल्ला केल्याची माहिती पुढे आली आहे. यानंतर पुणे पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्र फिरवली. तपासादरम्यान मुख्य आरोपी प्रशांत धुमाळ हा मुंबईत लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पुणे पोलिसांच्या पथकाने मुंबईत जाऊन प्रशांत धुमाळ याला बेड्या ठोकल्या आहेत.

दरम्यान, या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक करण्यात आली असून, हल्ल्यात सामील असलेल्या इतर फरार आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत. या कारवाईमुळे घायवळ टोळीला पुणे पोलिसांनी मोठा दणका दिला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पुणे! गुंड निलेश घायवळ टोळीतील टोळक्याने केले युवकावर सपासप वार…

निलेश घायवळ याच्या भावाला राजस्थानमधून अटक, मंदिरातील प्रसादावर…

कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्या थोबाडीत मारणाऱ्या पैलवान सागर मोहोळकरचा मृत्यू…

निलेश घायवळ गँगच्या सदस्याला अटक; धक्कादायक माहिती समोर…

निलेश घायवळ याची '8055 BOSS' अशी नंबर प्लेट असलेली गाडी जप्त…

गँगस्टर निलेश घायवळ पळाला स्विझर्लँडला, पुणे पोलिसांनी आवळल्या नाड्या….

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka