Dailyhunt
गँगस्टर निलेश घायवळ पळाला स्विझर्लँडला, पुणे पोलिसांनी आवळल्या नाड्या..

गँगस्टर निलेश घायवळ पळाला स्विझर्लँडला, पुणे पोलिसांनी आवळल्या नाड्या..

पुणे: कुख्यात गँगस्टर निलेश घायवळ याने कोथरूडमध्ये झालेल्या गोळीबारानंतर लंडनला पळ काढला. लंडनमधून त्याने स्विझरलँड पलायन केल्याची माहिती समोर आली आहे. पुणे पोलिसांनी त्याच्या नाड्या आवळल्या असून, त्याच्यासह कुटुंबीयांची आणि त्याच्या मालकीच्या एका व्यावसायिक आस्थापनेची मिळून विविध बँकांतील दहा खाती पोलिसांनी गोठवली आहेत.

पुणे पोलिसांनी गुन्हेगारी टोळ्यांच्या आर्थिक स्रोतांवर घाव घालण्याचा निर्णय घेतला असून, त्यातूनच हे पाऊल उचलण्यात आले आहे. घायवळ आणि त्याच्या कुटुंबीयांची एकूण दहा बँक खाती गोठवण्यात आली. त्यामध्ये एकूण 38 लाख 26 हजार रुपये जमा आहेत. पुढील तपासामध्ये या गुन्ह्याशी संबंधित अधिक आर्थिक व्यवहार आणि इतर आरोपीचा तपशीलही उघड होऊ शकतो. इतर आरोपींना अटक करण्यात आली असून, तपास पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून सखोलपणे चालू आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली.

दरम्यान, कोथरूड परिसरात घायवळ टोळीतील गुंडांनी दोन व्यक्तींवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गुन्ह्यांमध्ये कट आढळल्पाच्या आरोपाखाली टोळीप्रमुख निलेश घायवळ यालाही आरोपी करण्यात आले असून, एकूण दहा जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत (मकोका) कारवाई सुरू आहे.

पुणे शहरातील गुन्हेगारी टोळ्यांचे कंबरडे मोडण्याचा निर्धार पोलिसांनी घेतला असून, त्यानुसार कठोर पावले उचलली जात आहेत. या गँगस्टरविरोधात तक्रार देणाऱ्या व्यक्तींच्या सुरक्षेची जबाबदारी पोलिसांकडून घेतली जाणार आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली. आंदेकर टोळीविरोधात खंडणीची तक्रार देणाऱ्यांसह अन्य तक्रारदारांना सुरक्षा पुरविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

कुख्यात गुंड निलेश घायवळ याचे लोकेशन सापडलं! लंडनमध्ये नव्हे तर…

गुंड निलेश घायवळ याला पासपोर्ट कुठून मिळाला याची माहिती आली समोर…

पुणे पोलिसांनी आरोपींची काढली धिंड; निलेश घायवळ लंडनला…

पुण्यात घायवळ गँगचे मध्यरात्री 2 कांड; पाहा काय-काय केलं…

पुणे! घायवळ टोळीकडून शुल्लक कारणावरून भररस्त्यात एकावर गोळीबार…

पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्या श्रीमुखात लगावली पैलवानाने…

Video : पुणे पोलिसांनी चालवला आरोपींच्या अनधिकृत बांधकामावर बुलडोझर…

पुणे पोलिसांची मोठी कारवाई; सराईत गुंडांना डांबलं तुरुंगात…

The post गँगस्टर निलेश घायवळ पळाला स्विझर्लँडला, पुणे पोलिसांनी आवळल्या नाड्या…. appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka