Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पुणे हादरले! गरोदर प्रेयसीवर चाकूने सपासप वार अन् पुढे.

पुणे हादरले! गरोदर प्रेयसीवर चाकूने सपासप वार अन् पुढे.

पुणे: गरोदर प्रेयसीवर (वय २५) वार करत प्रियकराने तिला गंभीर जखमी केले पण सुदैवाने गरोदर युवती जीव वाचवून पळण्यात यशस्वी झाली. मात्र, तिच्या पोटातील बाळाचा मृत्यू झाला आहे.

विनायक सूर्यवंशी नावाचा युवक आणि पीडित युवती एकत्र कामाला होते.

दोघांची ओळख झाल्यानंतर पुढे मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. पुढे कामानिमित्त ही युवती मुंबईला गेली. विनायक 13 एप्रिल रोजी तिला घेऊन पुण्याला निघाला. रविवारी पहाटे लोणावळ्यात त्याने प्रेयसीवर चाकूने वार केले. प्रेयसी गरोदर होती. तिच्यावर वार केल्यानंतर तो जखमी अवस्थेतच तिला दिवसभर गाडीत फिरवत राहिला.

पौडजवळील सिंबायोसिस कॉलेजजवळ रविवारी रात्री त्याने गाडी उभा केली. संधी मिळताच युवतीने गाडीतून उतरून पळ काढला. पुढे प्रियकरही तिथून फरार झाला. जखमी युवतीला पौडचे पोलीस हवालदार संतोष दावलकर आणि दीपक पालके यांनी ससून रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणात युवतीचा जीव वाचला. मात्र, पोटातील बाळाचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी थेरगाव येथील संशयित आरोपी विनायक सूर्यवंशी याला ताब्यात घेतले असून, पुढील तपास करत आहेत.

The post पुणे हादरले! गरोदर प्रेयसीवर चाकूने सपासप वार अन् पुढे… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka