Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पुणे जिल्ह्यात गरोदर महिलाचा आढळला मृतदेह; हातावर रविराज नावाचा टॅटू.

पुणे जिल्ह्यात गरोदर महिलाचा आढळला मृतदेह; हातावर रविराज नावाचा टॅटू.

पुणे: इंदापूर तालुक्यातील बारामती-भिगवण राज्य मार्गावरील मदनवाडी गावाच्या हद्दीत एका पुलाखाली पाण्यात एका अज्ञात गरोदर महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.

गरोदर महिलेचा मृतदेह चादरीत गुंडाळलेल्या अवस्थेत होता. मृत महिलेचे वय अंदाजे २५ ते ३० वर्षांदरम्यान असावे, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. यामुळे हा प्रकार केवळ घातपात नसून, त्यामागे मोठे आणि गंभीर कारण असावं, असा संशय पोलिसांकडून व्यक्त होत आहे.

मदनवाडी पुलाखाली ही घटना उघडकीस येताच भिगवण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मृत महिलेच्या डाव्या हातावर ‘रविराज’ (Raviraj) नावाचा टॅटू कोरलेला आढळला आहे. मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत असल्याने, ही घटना सुमारे पाच ते सहा दिवसांपूर्वी घडली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे.

प्राथमिक अंदाजानुसार, हा खुनाचा प्रकार असण्याची शक्यता आहे. खुनाची घटना दुसरीकडे घडवून नंतर मृतदेह येथे आणून टाकण्यात आला असावा, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. भिगवण पोलीस या गुन्ह्याचा सखोल तपास करत आहेत. महिलेची ओळख पटवण्यासाठी आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, हरवलेल्या महिलांच्या तक्रारी आणि मोबाईल लोकेशन यांची कसून तपासणी केली जात आहे.

पुणे जिल्ह्यात ऐन सणासुदीत पत्नीची हत्या अन् नवऱ्याची आत्महत्या…

पुणे जिल्ह्यात वाढदिवसानिमित्त शोभायात्रा; डीजेच्या गाडीने घेतला एकुलता एका मुलचा बळी…

पुणे जिल्ह्यात विद्यार्थिनीने गळफास घेत केली आत्महत्या…

पुणे जिल्ह्यात सख्ख्या भावानेच 83 वर्षीय भावाचा केला खून अन्…

पुणे जिल्हा हादरला! भावकीच्या वादातून पाडला रक्ताचा सडा; हात-पाय तोडले…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka