Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पुणे जिल्ह्यात सख्ख्या भावानेच 83 वर्षीय भावाचा केला खून अन्.

पुणे जिल्ह्यात सख्ख्या भावानेच 83 वर्षीय भावाचा केला खून अन्.

पुणे: पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील जेजुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या मावडी गावात सख्ख्या भावानेच आपल्या 83 वर्षीय भावाचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. जमिनीच्या वादातून ही हत्या झाल्याचं प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.

पोलिस पुढील तपास करत आहेत.

मावडी गावातील बाजरीच्या शेतात 1 ऑगस्ट रोजी ज्ञानदेव लक्ष्मण भामे (वय 83) यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला होता. जेजुरी पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. शवविच्छेदन अहवालात मृत्यूला मारहाणीचे कारण असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासादरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की मृत ज्ञानदेव भामे आणि त्यांचा सख्खा भाऊ चांगदेव लक्ष्मण भामे (वय 68) यांच्यामध्ये गेल्या काही वर्षांपासून जमिनीच्या मालकीवरून वाद सुरू होता. या वादातून मोठ्या भावाचा खून केला. पोलिसांनी आरोपी चांगदेव भामे याला ताब्यात घेतले आहे. प्राथमिक चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, जमिनीच्या वादातूनच हे टोकाचं पाऊल उचलल्याचे सांगितले आहे. आरोपीने मृताच्या डोक्यावर आणि अंगावर घाव घालून त्याचा खून केल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेने मावडी गावात आणि परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून, प्रथम भावाला शेतात बोलावून नेल्यानंतर धारदार हत्याराने हल्ला करून जागीच ठार केले. हत्या केल्यानंतर मृतदेह बाजरीच्या शेतातच पुरला. मात्र, मृतदेह सापडल्यामुळे हा सर्व प्रकार उघडकीस आला. जेजुरी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, त्याच्यावर भादंवि कलम 302 आणि इतर संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे शहरात अनैसर्गिक संबंधातून खून करणाऱ्या आरोपीला शिरूरमधून अटक…

पुणे शहरात युवकाचा खून करणाऱ्या आरोपींना २४ तासाच्या आत सोलापूर येथून केले जेरबंद…

पुणे जिल्ह्यातील महिलेच्या खूनाचं गूढ उलगडलं; बिबट्या नव्हे तर उपसरपंच पुतण्या…

The post पुणे जिल्ह्यात सख्ख्या भावानेच 83 वर्षीय भावाचा केला खून अन्… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka