Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पुणे जिल्ह्यात ओढ्याच्या कडेला आढळला बेवारस मृतदेह.

पुणे जिल्ह्यात ओढ्याच्या कडेला आढळला बेवारस मृतदेह.

मंचर, पुणे (कैलास गायकवाड): पुणे जिल्ह्यातील लोणी (ता. आंबेगाव) येथील विठ्ठलवाडी परिसराला पाणीपुरवठा पुरवठा करणाऱ्या विहिरी जवळ अनोळखी पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला आहे.

पारगाव (कारखाना) पोलिसांनी अकस्मित मृत्यू म्हणून नोंद केली आहे.

लोणी येथील अनिल आबाजी नाईक यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, 16/ 5/2024 दुपारी साडेतीनच्या सुमारास पोलिस पाटील संदीप आढाव व मी आम्ही लोणी गावात जात असताना आम्हाला ओढ्यापाशी दुर्गंधीचा वास आल्याने आम्ही त्या वासाच्या दिशेने गेलो असता गावच्या सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरी जवळ चिंचेच्या झाडाखाली ओढ्याच्या बाजूला अंदाजे 35ते 40 वर्षे वयाचा व्यक्ती पडलेला दिसला. नंतर पोलिस पाटील संदीप आढाव यांनी पारगाव पोलिसांना फोन करून माहिती दिली.

पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उपजिल्हा रुग्णालय मंचर येथे शवविच्छेदनसाठी घेऊन गेले. सहाय्यक पोलिस निरीक्षक नेताजी गंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक भाऊसाहेब लोकरे करत आहेत.

The post पुणे जिल्ह्यात ओढ्याच्या कडेला आढळला बेवारस मृतदेह… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka