Dailyhunt
पुणे जिल्ह्यात वाढदिवसाच्या कार्यक्रमावेळी सराईत गुन्हेगारांचा गोळीबार, एकाचा मृत्यू.

पुणे जिल्ह्यात वाढदिवसाच्या कार्यक्रमावेळी सराईत गुन्हेगारांचा गोळीबार, एकाचा मृत्यू.

पुणे: पुणे जिल्ह्यातील देहूरोडच्या गांधीनगर परिसरात जुन्या भांडणाच्या वादातून गोळीबाराची घटना घडली आहे. देहूरोड येथे वाढदिवसाचा कार्यक्रम सुरू असताना सराईत गुन्हेगाराकडून गोळीबार करण्यात आला आहे.

या घटनेत विक्रम गुरुस्वामी रेड्डी या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

चाकण एमआयडीसीमध्ये काही दिवसांपुर्वी गोळीबार झाला होता. चुलत भावाने भावाची सुपारी दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. कौटुंबिक वाद आणि ईर्षा यातून जीवे मारण्याची सुपारी दिली होती. संग्राम सिंग असे सुपारी देणाऱ्या चुलत भावाचे नाव आहे. त्याने अजय सिंगची हत्या करण्यासाठी चौघांना सुपारी दिली होती. हत्येच्या उद्देशाने कैलास स्टील कंपनीच्या प्रवेशद्वारावर अजय सिंगवर गोळीबार झाला होता.

गोळीबार करणाऱ्या दोघांपैकी रोहित पांडे याला उत्तर प्रदेशातून अटक केल्यावर चुलत भावाचे बिंग फुटले. अजय आधी संग्राम कडे कामाला होता, अजयला या स्टील क्षेत्रात संग्रामनेचं आणले होते. मात्र अजय मोठा होऊ लागला, हे संग्रामला पाहवत नव्हते. यातून संग्रामने अजयची सुपारी दिली आणि सगळा प्रकार घडला. या दरम्यानच्या काळात चुलत भाऊ जखमी भावाला पाहण्यासाठी हॉस्पिटलमध्ये ही आला होता. पिंपरी चिंचवड पोलीस काय-काय तपास करत आहेत, याची ही माहिती तो घेत होता. मात्र अखेर पोलीस तपासात त्यानेच सुपारी दिल्याचे उघडकीस झाले. हे ऐकून अजयला मात्र विश्वास बसेना. मी ज्याला आदर्श मानत होतो, तोच माझ्या जीवावर उठला. हे उघडकीस झाल्यावर त्याला मोठा धक्का बसला.

बीड! प्रेयसीच्या दारात जाऊन खिडकीतून केला गोळीबार…

पुणे शहरातील कात्रज घाटात गोळीबार; कारण समोर…

पुणे! बिअरबारच्या बाहेर अ‍ॅम्बुलन्स पोहचताच केला गोळीबार; कारण पाहा…

Video: पुणे शहरात पुन्हा गोळीबार; माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा मृत्यू…

पुणे शहरात चोरट्यांनी केला पोलिस अधिकाऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न; स्वसंरक्षणार्थ गोळीबार…

The post पुणे जिल्ह्यात वाढदिवसाच्या कार्यक्रमावेळी सराईत गुन्हेगारांचा गोळीबार, एकाचा मृत्यू… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka