मंचर, पुणे (कैलास गायकवाड): मंचर (ता. आंबेगाव, जि. पुणे) येथील डॉ. कैलास रघुनाथ वाळे (रा. पार्थवि सोसायटी मंचर (मुळगाव झोळे ता. संगमनेर जि. अहिल्यानगर) यांचे अपहरण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आणि एक लाख रुपयाची खंडणी वसूल केली.
याप्रकरणी योगेश चौधरी, मनोज कडलक, प्रवीण ओव्हाळ, (सर्व राहणार खेड) तुषार टेके, आदिनाथ नाईकरे, पवन थोरात (सर्व राहणार मंचर) या सहा जनावर गुन्हा दाखल झाला आहे. डॉक्टर कैलास वाळे हे मंचर येथे राहत असून, राजगुरूनगर येथे जैन धर्मार्थ दवाखान्या मध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करत आहेत. ते समर्थ क्लिनिक पेठ येथून दुपारी मंचरकडे येत असताना दोन-तीन अनोळखी व्यक्तीने त्यांच्या गाडीला सफारी गाडीने धडक देत त्यांना जबरदस्तीने मारहाण करत गाडीत बसवून निघोट वाडीतील जंगलात घेऊन गेले. तेथे असलेल्या इतरांनी त्यांना मारहाण केली.
डॉ. वाळे यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ बनवला पवन थोरात याने प्रविण ओव्हाळ कडून पिस्तूल घेऊन डॉ. वाळे डोक्या जवळ लावून एक गोळी झाडली व तुला जीव वाचवायचा असेल तर आम्हाला 20 लाख रुपये दे अशी मागणी केली. डॉ. वाळे यांनी घाबरून मी 15 लाख रुपये देतो असे सांगितले. त्यावेळी ओहाळ यांनी त्याच्या मोबाईल मधील पूर्वी डॉक्टरांशी संबंधित असलेल्या तरुणीला मी त्रास देणार नाही व मी सर्वांची माफी मागतो असा व्हिडिओ बनवला. नंतर शरद बँकेतून एक लाख रुपये काढून ओव्हाळ यांच्याकडे दिले. पुढे डॉ. वाळे यांना पेठ कडे नेत असताना निघोटवाडी फाट्यावर थोरात व टेके हे उतरले. ओहोळ व नाईकरे हे डॉ. वाळे यांना संध्याकाळी साडेसात वाजता खेडला घेऊन गेले. नंतर आठ वाजता डॉ. वाळे यांना पेठ येथे सोडले. असे डॉ. वाळे यांनी सांगितले. मंचर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक बडगुजर पुढील तपास करत आहेत.
पुणे शहरात आईच्या डोळ्यादेखत मुलीचे एकतर्फी प्रेमातून अपहरण…
ठाकरे गटाच्या शहर प्रमुखाचं अपहरण! आज फक्त उचललंय, यानंतर जीवे मारू…
महाराष्ट्र हादरला! सरपंचाचे भर दिवसा अपहरण करून केला खून…
भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे अपहरण करून हत्या, मृतदेह सापडला…
धक्कादायक! पुणे शहराजवळ कोयत्याने सपासप वार करुन एकाची हत्या…
The post पुणे जिल्ह्यातील डॉक्टरचे अपहरण करून जीवे मारण्याचा प्रयत्न… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

